नागपुरात आ. रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थित रहा- माजी गृहमंत्री अनिल देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथे एक डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा व शहर यांची आढावा बैठक बालाजी सभागृह येथे पार पडली. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत
जिल्ह्यातील व शहरातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
नागपुरात दिनांक 12 डिसेंबर 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती राहणार आहे. नागपूर येथे आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा समारोपीय कार्यक्रम झिरो माईंड येते दुपारी तीन वाजता होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हाने त्यांनी केले.
विदर्भ प्रभारी आ.अनिलबाबू देशमुख,माजी आमदार श्री.दीनानाथ पडोळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रविकांत वर्पे,जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप पनकुले, व शहराचे निरीक्षक श्री.शेखर सावरबांधे,प्रदेश सरचिटणीस ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल,शहर कार्याध्यक्ष सुधाकर कातकर,महीला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके,युवकचे जिल्हाध्यक्ष सुमित समर्थ,शहर युवक अध्यक्ष कलाकार मलारप,प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख,नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस सौ.अंजली साळवे-विटणकर,प्रदेश चिटणीस डी.के.आरिकर,प्रदेश चिटणीस ऍड.संजय ठाकरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी ते चंद्रपूर येथील ज्वलंत समस्या बाबत म्हणाले, या सरकारने जून जुलै 2023 मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याचे सर्वे पण झाले. त्या संदर्भाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला 58 हजार हेक्टर जमीन पिक पुरामुळे उध्वस्त झाले. 56 कोटी शासनाने द्यावे अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढे महिने होऊ नये अजून नूस्कान भरपाई आली नाही. परत आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्या धान ,कापूस, तुर आणि मराठवाड्यातील हजारो हेक्टर शेतातील द्राक्षाच्या शेती भुईसपाट झाल्या, सरकार आपल्या प्रचारात, आणि सरकार कसे वाचेल याच्यात गुंतवत असून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार असल्याची घनाघथा आरोप आणि देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांचा 24 घंटे विद्युत उपलब्ध करून द्यावी, पिक विमा लवकरात लवकर द्यावा, महागाईवरील सरकारवर सरसाधन साधले.
पत्रकारनी प्रश्न केले असता 83 वर्षाच्या बापाला सोडून आम्ही जाणार नाही, तिगाळी सरकार कडून आम्हालाही आफर आली होती. जे गेलेत ते ईडीच्या भीती नीच गेले. मलाही काही गुन्हा नसताना यात अडकवल्या गेले. पवार साहेबांचे स्पष्ट मत होते की, मी कदापी भाजपबरोबर जाणार नाही, आणि तुम्ही परत जाऊ नका!
चंद्रपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार यांच्या गटात गेलेले. ग्रामीण अध्यक्ष नितीन भटारकर आणि शहर अध्यक्ष राजू कक्कड यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवून दाखवावी त्यांची डिपॉझिट जप्त नाही झाली, तर मी खोटे बोललो असे समजा! असा खोचक तुला माननीय माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला.