तिरवंजा येथील अवैध गौण खनिज उत्खननाचे महसूल विभागाने केले मोजमाप? कुकडेच्या तक्रारीने तस्करात हलचल!
ट्रांसपोर्टर शामकांत व त्यांच्या इतर सहकार्यांवर दंडात्मक कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येत असलेल्या मौजा तिरवंजा साज्यातील गौण संपतीची ट्रांसपोर्टर शामकांत , सचिन व त्यांच्या इतर सहकारी यांनी केवळ 200 ते 300 ब्रॉस गौण खनिज उत्खनन करण्याची तात्पुरती परवानगी असतांना तिथून त्यांच्या दुपटीने म्हणजे हजारो ब्रॉस गौण खनिज उत्खनन केले असल्याची तक्रार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी वरोरा व तहसील भद्रावती यांच्याकडे केली होती, या तक्रारीची दखल घेऊन नुकतेच भद्रावती तहसीलदार यांनी नायब तहसीलदार भांदककर, मंडळ अधिकारी वाटेकर व तलाठी तिरवंजा यांना आदेश देऊन किती गौण खनिज उत्खनन करण्यात आले. याचे मोजमाप करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते. दरम्यान काल या संपूर्ण गौण खनिज उत्खनन ठिकाणी मोजमाप करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला व तो येत्या 16 नोव्हेंबर ला तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ह्या अहवालात कोट्यावधी रुपयांच्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदार ट्रान्सपोर्टर शामकांत, सचिन व इतरांवर कोणती कारवाई करतात
याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महसूल विभागाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून सर्रास अवैद्य गौन खनिज संपत्तीची चोरी करून शासनाचा महसूल बुडवला जात आहे.
शामकांत व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या गौण खनिजांचे उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविला आहे. रेती चोरी नंतर गौण खनिजांची चोरी करणारे शामकांत यांच्याकडे पोकल्यान मशीन जेसीबी व कित्तेक हायवा ट्रक असल्याने आजपर्यंत त्यांनी कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज विकून शासनाचा महसूल बुडविला आहे, अवैध रेती व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या शामकांत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दादागिरी करून ज्या पद्धतीने राष्ट्रीय संमतीची चोरी चालवली आहे त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत॑ आहे.
कोट्यावधी रुपयांच्या या गौण खनिज उत्खनन प्रकरणी त्या ठिकाणी एक पोकल्यान व तीन जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला आणि हायवा ट्रकने वाहतूक करण्यात आली त्या सर्व मशीन व ट्रक जप्ती करण्यात याव्या अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.