राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी घेतला विविध रुग्णालयातील मृत्यू बाबतचा आढावा




राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी घेतला विविध रुग्णालयातील मृत्यू बाबतचा आढावा



दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नांदेड येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव घडले, आणि राज्यभरात आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी राज्यातील सर्व विविध रुग्णालयातील मृत्यू बाबत आढावा घेतला. नांदेड येथे झालेल्या मृतांचा आकडा, छत्रपती संभाजी नगर, नागपूर येथील सरकारी रुग्णालयात घेतली आकडेवारी.
दर महिन्याला होणारा मृत्यू दर, आणि दैनिक सरासरी मृत्यू दराचे प्रमाण किती या संदर्भात आकडेवारी माहिती घेतली असून नागपूर मेवा आणि मेडिकल रुग्णालयात मासिक मृत्युदर 532 तर प्रतिदिन 17 मृत्युदर होत असल्याची बाब समोर येत आहे. नांदेड रुग्णालय मासिक मृत्यूदर 401 तर प्रतिदिन सरासरी 13 रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे समोर आली आहे.
संभाजीनगर रुग्णालयात दर महिन्याला 426 रुग्णांचा मृत्यू होत असून प्रतिदिन सरासरी 14 रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आकडा समोर आला आहे.
नागपूर शासकीय रुग्णालयात प्रतिदिन सरासरी 17 पेक्षा मृत्यू तर कधी 17 पेक्षा अधिक सुद्धा असतात. अशी माहिती राज्याचे सचिव यांनी दिली असून खाजगी रुग्णालयात येणारे रुग्ण हे अतिशय क्रिटिकल अवस्थेत असतात. शासकीय सुट्ट्यांच्या काळात जसे की लगातार पाच दिवसाच्या सुट्ट्या आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे सरकारी रुग्णालयाकडे रुग्णांचा अधिक ओढ वाढला असल्याने वृत्तांची आकडेवारी हे अधिक सामोर आल्याचे राज्याचे सचिव यांनी माहिती दिली.