चंद्रपूरात उद्यापासून श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन
रक्तदान शिबिर कार्यक्रम तसेच रक्तदात्यांचा सत्कार!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त
दिनांक 29 रविवार व 30 सोमवार 2023 ऑक्टोबरला श्री संत नगाजी महाराज देवस्थान समाधी वार्ड चंद्रपूर येथे उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस चालणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमात श्रींची घटस्थापना, रांगोळी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, तसेच
यावर्षी नाभिक समाजाकडून दिंडी व भव्यशोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी नाभिक समाजातील भाविक बांधव, भगिनींनी श्री संत नगाजी महाराजांच्या शोभा यात्रेस रविवार दिनांक 29 ऑक्टोंबरला सायंकाळी चार वाजता निघणारा शोभा यात्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 30 ऑक्टोबरला श्री च्या मृत्यूचे अभिषेक, श्रींच्या पोथीचे पारायण, रक्तदान शिबिर कार्यक्रम,
रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तसेच मागील वर्षी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्व रक्तदातांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. अशा रक्तदात्यांनी या भव्य शिबिरात आपले रक्तदान करून एखाद्याला जीवनदान द्यावे, यापेक्षा दुसरे दान असू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. रक्तदान शिबिरात आवर्जून रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन त्याकडून करण्यात आले आहे.
दहीहंडी आणि काला, प्रवचन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, क्रीडा सांस्कृतिक, कला, आध्यात्मिक क्षेत्रातील, रांगोळी पाक कला स्पर्धेचे वितरण, कार्यक्रमाच्या अंती महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी होणाऱ्या पुण्यतिथी उत्सवास आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान श्री संत नगाजी महाराज उत्सव समितीकडून करण्यात येत आहे.