चंद्रपूरात माता महाकाली महोत्सवाला 19 ऑक्टोंबर पासून प्रारंभ






चंद्रपूरात माता महाकाली महोत्सवाला 19 ऑक्टोंबर पासून प्रारंभ

श्री माता महाकाली नगरप्रदक्षिणा पालखीचे मुख्य आकर्षक..


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरकरांचे आराध्य दैवत माता महाकाली ,श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने आयोजित 19 ते 23 ऑक्टोबर या पाच दिवसीय महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येईल. नऊ वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना आणि दहा वाजता माता महाकाली महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
नवरात्र काळात जन्माला आलेल्या कन्यारत्नांना चांदीचे नाणे वितरित करून सत्कार करण्यात येईल. या संबंधाची माहिती संबंधित रुग्णालयाला, नगरपालिकेला देण्यात आली आहे. यासोबतच सामाजिक संस्थाचा सत्कार, आरोग्य शिबिर, महिला सुरक्षा मार्गदर्शन, संगीत प्रवचन, समूह नृत्य, भजन व त्या रात्री प्रसिद्ध गायक लकबीर सिंग लख्खा यांच्या गीत जागरण कार्यक्रम होणार आहे. 20 ऑक्टोबरला कवी संमेलन, भक्तिस्वाराभिषेक, सा रे ग म प निरंजन बोबडे यांचे विविध रूपात दर्शन घडणार 151 कलावंताचा भक्ती स्वराभिषेक कार्यक्रम, 21 ऑक्टोबरला बाल कीर्तनकार कुमारी साक्षी अतकरे यांचे कीर्तन, सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचे गीत संगीत कार्यक्रम, 22 ऑक्टोबरला महिलांसाठी युवा कीर्तनकार झी टॉकीज फेम माननीय सोपान दादा कनेरकर यांचे कीर्तन, त्यानंतर जगप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचे भक्तिमय कार्यक्रम, याच दिवशी गायत्री परिवाराकडून 11111 दिव्यांचा दीपोत्सव, करण्यात येणार आहे.
याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 23 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे महोत्सवाचे आयोजक चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शेवटच्या दिवशी 23 ऑक्टोबरला 9999 कन्याचे कन्या पूजन व कन्या भोजन, तसेच ऐतिहासिक हेरिटेज वॉक, श्री माता महाकाली महोत्सव मंडपातील आकर्षण, ''बाई पण भारी देवा" मला पण आज बोलायचं आहे यासाठी महिलांकरिता व मुलींकरिता मुक्त व्यासपीठ उपलब्ध असणार आहे.
श्री माता महाकाली नगरप्रदक्षिणा पालखीचे मुख्य आकर्षक राहणार असून या विशेष आकर्षण कार्यक्रमात "मंदिर अब बनने लगा है" या गाण्याची सुप्रसिद्ध गायिका ईशरत जहाँ यांचा रोड शो होणार आहे.

यास जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वेळ घेऊन त्यांना सुद्धा निमंत्रित, या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी होणाऱ्या महोत्सवात यावे, हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास यावे, हा महोत्सव आता दरवर्षी होणार असून अखंड चालत राहील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत महाकाली ट्रस्टचे सचिव विजय मोगरे, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, यांच्यासह श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. जनतेने या संपूर्ण पाच दिवसात होणाऱ्या महोत्सवाचा भरभरून आनंद घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.