अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाची कारवाई, चंद्रपूर विभागाने बांधली डोळ्यावर पट्टी!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू पान मसाल्यावर बंदी आहे. मात्र सर्रास राज्यात सुगंधित पान मसाला विकला जात आहे. यावर चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा अन्न व औषध प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. परंतु या या बांधलेल्या पट्टीला खोलण्याचे काम नागपूर विभागातील अन्य व औषध प्रशासनाने करून चंद्रपूर जिल्ह्यातील या विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे?
महाराष्ट्र राज्यातील सीमा लगत असलेल्या आंध्र, तेलंगणा प्रदेशातून सर्रास महाराष्ट्रात सुगंधी तंबाखूची तस्करी केली जात आहे. ची माहिती चंद्रपूर पोलीस, आणि अन्न व औषध विभागाला न होता. सरळ नागपूर विभागाला याची कारवाई करावी लागते त्यापेक्षा जिल्ह्यात दुसरी शोकांतिका काय असू शकते. हा सर्वसामान्यांना समजणारा विषय आहे. मात्र याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील अन्न व औषध, आणि संबंधित पोलीस विभाग हात ओले असल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतात.
काल महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लालपुर विसापूर टोल नाक्यावर दोन ट्रक सुगंधी तंबाखू भरलेले जप्ती करण्यात आली. यात आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई समजल्या जात आहे.
सुगंधी तंबाखू पान मसाल्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. अनेक दुर्गंध अशा आजारांना बळी पडत आहेत.
मानवी शरीरात असाध्य कॅन्सर सारख्या रोगाला आश्रय देऊन मृत्यूला कवटाळले. त्याची विक्री करणारा तस्कर
सेठ करोडपती होत असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला कठपुतळी बनवले आहे. या टोल नाक्यावरून रोज शेकडो वाहनाची आवक जावक असते. स्थानिक प्रशासनांना याची भनक न लागणे,
स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना म्हणजे जिल्ह्याबाहेरून आलेल्या विभागाने पथकाने कारवाई करणे म्हणजेच स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे होय!
नागपूर अन्न व औषध विभागाने सुगंधी तंबाखू सागर पान मसाला भरलेले ट्रक अडवले. बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनअटकाची कारवाई करण्यात आली आहे. सुगंधी तंबाखाचा तस्कर मोरक्या कोण याच्या शोध पोलिसांनी घेणे व कळक कारवाई करणे गरजेचे आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर आणि अमरावतीच्या दक्षता पथकाने चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित पान मसाल्याचे दोन ट्रक जप्त केले आहेत. TS 07 UE 7206 आणि MH 25 U 1211 क्रमांकाचा ट्रक विसापूर टोल नाक्याजवळ सायंकाळी 5 वाजता पकडला गेला. या दोन्ही ट्रकमधील 1 कोटी 11 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही ट्रक चालक व वाहकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हा माल कर्नाटकातील बिदर येथून मध्य प्रदेशात नेल्याची माहिती त्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.अधिक तपास व कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाने बल्लारपूर पोलिसांच्या यांच्या ताब्यात दिले आहे.पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.