... त्याच्या चातुर्य बुद्धीने अवाक झाले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगर हळदी गाव या गावात सोहम
नावाचा जीनियस चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांना सायकलिंग करताना भेटला. सहज त्याला विचारपूस करण्यात आली. परंतु त्याच्या तल्लख, बुद्धीचे चातुर्य पाहून भविष्याचे आत्तापासून विचार करणारा मुलाचे फार कौतुक केले. त्याचे नाव सोहम सुरेश उईके असून तो आठवी शिकत आहे. परंतु त्याला आतापासूनच पुढील उच्चशिक्षणाचे वेळ लागले आहेत. जीवनात मोठ व्हायचं असेल तर प्रत्येक गोष्टी वेळेनुसार करण्यात याव्या असे तो म्हणतो.आई वडील मिळेल ते काम करतात. आमच्या दोन फिड्यात कोणीही नौकरी वर
नाही. म्हणून मला upsc, असा मोठा अधिकारी व्हायचे आहे. चांगली नौकरी, समाजसेवा करता येईल.
या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गप्पा-गप्पात यूपीएससी- शिक्षण - रोजगार- खेळणे- बाळगणे हे सर्व विचार धडाधड मांडले.
सहज गप्पा सुरु झाल्यावर सोहमच्या तीक्ष्ण, चातुर्य बुद्धीमत्तेने अवाक झाले पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, त्याच्या या तीक्ष्णबुद्धीच्या व्हिडिओने इकडे तिकडे फार चर्चा होत आहे. एवढेच नाही तर भविष्यात कुठल्याही प्रकारची शैक्षणिक दृष्ट्या अडचण आलास आम्ही मदत करू. तु हूशार आहेस चांगला अभ्यास करून मोठा हो. काही अडचण आलीस
तर संपर्क करण्यासाठी त्याला पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
ग्रामीण भागातही आजच्या पिढीमध्ये तलकबुद्धी असून फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यातूनही गावठी जिनियस सारखे विचार आज महाराष्ट्राच्या नवीन पिढीला आवश्यकता आहे.