होमगार्ड सैनिकांचा '.. या' मागण्यासाठी बंदोबस्तावर बहिष्कारचा इशारा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या अन्याय विरुद्ध धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघ संघटनेच्या वतीने उद्यापासून राज्यव्यापी बहिष्कराच्या इशारा आज पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या 76 च्या इतिहासापासून होमगार्ड सैनिक मानधनावर ' निष्काम सेवा' वेठबिगारी तत्त्वाखाली कुठल्याही प्रकारची तमा न बागडता कार्य कर्तव्य समजून सेवा देत असतो. मात्र मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातील 50 लक्ष देतील होमगार्ड सैनिक स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या अत्याचाराविरोधात शासनाकडे लढा लढत आहे. मात्र सरकारला कुठली जाग येत नाही. वर्षातून फक्त काही सणावाराच्या निमित्याने 120 दिवस फक्त कर्तव्यावर असतात. बाकी दिवस बेरोजगार असतात. म्हणून सरकारकडे नियमित 365 दिवस रोजगार हक्काचे न्याय मिळावे यासाठी मागणी केली आहे. या संदर्भात मुंबई आझाद मैदान येथे होमगार्ड सैनिकांनी महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाच्या नेतृत्वात सलग दहा दिवस उपोषण राबविले होते. जळगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मुख्य मागण्या संदर्भात आंदोलनातील नेतृत्व, आयोजक आणि उपोषण आंदोलनकर्त्याची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोन द्वारे सहवासातला होता. आपल्या मागण्या रास्त असून दहा ते पंधरा दिवसाच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संयुक्त भेट घालून होमगार्डांना 365 दिवस नियमित रोजगार सह इतर 20 मागण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु ते आश्वासन तसेच राहिले असून त्या विषयावर कुठलीही प्रकारची चर्चा केली जात नसल्याने महाराष्ट्राचे मानसेवी होमगार्ड सैनिक सम्तप्त झाले आहेत. आता होमगार्ड सैनिकाचा शासनावरून विश्वास उडाला आहे. म्हणून येणाऱ्या सर्व निवडणुका, शासकीय नियम शासकीय कार्यक्रमावर, तसेच निवडणुका बंदोबस्तावर बहिष्कार घालण्याचा इशारा आज पत्रकार परिषदेतून व्यवस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव पाटील, यांनी दिला आहे. यावेळी सचिन मासुरकर, वीरेंद्र उईके, राम बेलसरे, निखिल करवाडे, स इतर होमगार्ड उपस्थित होते.
महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिकांना कुठल्याही सुख सुविधा मिळत नसून वेल फंड दिला जात नाही. अपघात झाल्यास कुठलीही सुख सुविधा मिळत नाही. आतापर्यंत आर्थिक विवेचनाला कंटाळून राज्यातील 40 होमगार्ड सैनिकांनी आत्महत्या केल्या आहेत. याकडे अजूनही शासनाने त्यांच्या परिवाराला कुठलीही मदत केलेली नाही. म्हणून शासनाने संविधानिक वीज मागण्या मान्य न झाल्यास होमगार्ड सेविकांचा येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रम बंदोबस्तावर बहिष्कार करण्याचा इशारा दिला आहे.