प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार यांचे प्रेत मिळाले या विहिरीत !




प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार यांचे प्रेत मिळाले या विहिरीत !

आत्महत्या की,....

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
येथील प्रसिद्ध उद्योगपती उमाकांत मामीडवार हे मागील दोन दिवसापासून घरून निघून गेले होते. या संदर्भाची तक्रारही रामनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती. काल रात्री दाताळा येथील असलेल्या खपती महाराज मंदिराच्या विहिरीत त्यांचे प्रेत सापडले.
श्री. उमाकांत मामीडवार, वय वर्ष ८७, सडपातळ बांधा, उंची ५.३", अंगावर सफारी ड्रेस, राहणार गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर. आज हे गृहस्थ संध्याकाळी ४.१५ वाजता घरून निघून गेले होते. त्यांची बॉडी शासकीय रुग्णालयात आणली असून रामनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास राम मनगर पोलीस करीत आहेत.
प्रसिद्ध कंत्राटदार जयंत मामीडवार, विवेक मामीडवार यांचे ते वडील असून मामीडवार परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. उमाकांत मामीडवार आपली जीवन यात्रा का संपवली यावर चंद्रपूर शहरात चर्चा सुरू आहे.