ऑनलाइन महासेतु केंद्रातून जनतेची सर्रास आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करा - संतोष पारखी
शासकीय, शैक्षणिक दाखले ऑनलाइन काढण्याकरीता महासेतु मार्फत जनतेची सर्रास आर्थिक लूट करण्यास भाग पाड़ण्याऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा..!
शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी यांना मागणी
चंद्रपुर तहसीलदार विजय पवार यांनी तालुका समन्वय,संचालक व सर्व सेतु केंद्र धारकांना दिली तंबी!*
दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर :-
येथील तालुक्यातील शासकीय व शैक्षणिक कागदपत्रे / दाखले ऑनलाइन काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेची सर्रास आर्थिक लूट महासेतु मार्फत सुरु असून सदर कारभार करण्यास भाग पाड़ण्याऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करुन यापासून जनतेमध्ये सरकारबद्दल होत असलेला अपप्रचार रोखुन शासन आपल्या दारी ही संकल्पनेची अंमलबजावनी करण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी अधीक्षक प्रिती डुदुलकर मार्फत चंद्रपुर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.*
*सदर विषयासंदर्भात दि.10 ऑगस्त 2023 ला चंद्रपुर तहसीलदार विजय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी तात्काळ दि.11 ऑगस्त 2023 नोटिस काढून दि.14 ऑगस्त 2023 ला सभा घेवून तालुका समन्वय,संचालक व सर्व सेतु केंद्र धारकांना तंबी देवून आर्थिक गैरव्यवहार न करता नियमाचे पालन करुन जनतेची कामे जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चंद्रपुरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील महासेतुला निर्देश देवून होणाऱ्या जनतेची आर्थिक पिळवणुकीतुन सूटका करावी.*
*जेव्हा कि, आपल्या देशात राहणार्या सर्व लोकांना चांगल्या सरकारी सेवा मिळाव्यात यासाठी सरकारकडून सर्व सरकारी सेवा डिजीटल केल्या असून याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महा ई सेवा केंद्र ही योजना सुरू आहे.*
*महाराष्ट्र राज्यात राहणार्या अशा लोकांना ज्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवायचा आहे, त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. महा ई सेवा केंद्राला भेट देऊन एखादी व्यक्ती विविध प्रकारच्या सरकारी योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकते. तसेच शासकीय व शैक्षणिक कागदपत्रे / दाखले देखील काढणे सोपे होऊन यामुळे व्यक्तीचा पैसा तर वाचतोच, सोबतच त्यांचा वेळही वाचतो.*