चंद्रपुरातील इरई आणि झरपट जलपरी 'त्या' नोटीसाने मोकळा श्वास घेईल का?





चंद्रपुरातील इरई आणि झरपट जलपरी 'त्या' नोटीसाने मोकळा श्वास घेईल का?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातून वाहत असलेल्या इरई आणि झरपट अशा दोन जलपरी या नदीलगतच्या क्षेत्र पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असताना या भागातील जमिनीवर दलाल बिल्डरानी प्लॉट पाडून अवैद्यरित्या विक्री करीत असलेल्या त्या पूरग्रस्त क्षेत्रात विक्री करणाऱ्या सात प्लॉट धारकांना मनपाची नोटीस बजावली आहे. खरंच चंद्रपूरच्या दोन जलपरीवर अवैद्य रित्या अतिक्रमण करून मोठमोठी घरे उभारली आहेत. मग या नदीवर बांधलेल्या 'घरात नदीच्या पुराचे पाणी जाते की, नदीत घरे बांधल्याने त्यांच्या घरात पाणी जाते' हा प्रश्न चंद्रपूरकरांना भेडसावत आहे!
या नदीकाठालगत अवैध्य रित्या बांधकाम करून
नागरिकांने पाण्याचा प्रवाह रोखला त्यामुळे सतत पूर परिस्थिती निर्माण होते. आणि नंतर मात्र प्रशासनाची ससेहोलपट सुरू होते. या वारंवार होणाऱ्या त्रासाला जबाबदार मनपा प्रशासनच
आहे. हे विसरता कामा नये!
आता उशिरा का होईना मनपा प्रशासनाने सात लोकांवर महानगरपालिकेची नोटीस बजावले असल्याची माहिती समोर आली आहे. या नोटीसाने ईरई आणि झरपट जलपरी मोकळा श्वास घेईल का?

इरई आणि झटपट नदी अक्षरश: गिळंकुत केली गेली आहे. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घर वस्त्या बनल्याने वडगाव, पठाणपुरा, जमंजट्टी, भंगाराम, महाकाली मंदिर मागचा परिसर, रहेमतनगर, नगीनाबाग या भागात रेड झोन असलेल्या जागेत अवैद्य बांधकामे करण्यात आली.
शहरातील इरई आणि झरपट नदीचे लघु पाटबंधारे विभागाने पूरग्रस्त क्षेत्राचा नकाशा जाहीर केला. या परिसरात कुठलीही नवीन बांधकामाची परवानगी नसताना. केवळ राजकीय नेत्यांना हाताशी धरून, नेतेही आपले ओटर बँक समजून प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. अनेक बिल्डरांनी कमी किमतीत शेत जमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी स्वस्त दरात प्लॉट विकून त्याची नोटरीवर विक्री केली जात आहे. मागील महिन्यात बराच पाऊस झाल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीला नदी काठावरील अवैद्य बांधकामच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नदीपात्रा लगत बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारची नोटीस यापूर्वीही महानगरपालिकेने संबंधित प्लाटधारकांना बजावली होती परंतु त्याचे काय? येरे माझ्या मागल्या! ते तसेच राहिले. आणि पुन्हा पूर परिस्थितीचा सामना महानगरपालिका प्रशासनाला करण्यास भाग पडले. हे असे कधीपर्यंत चालत राहणार असा प्रश्न आता चंद्रपूरकरांना पडला आहे.
आता यावर मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी मनपा प्रशासनाच्या माध्यमातून दिलेल्या नोटीस वर काय कारवाई करतात याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहेत.