विवाह सोहळ्यात जनजागृतीचे फलक लावून वेधले सर्वांचे लक्ष!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येते आज 1 जुलै 23 ला आयु. अजय दुर्गे संग आयु. ममता यांचा मंगल परिणय सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने करून मंगल परिणय सोहळ्या आलेल्या सर्व पाहुण्यांचे लक्ष वेधुन घेतले. हा विवाह सोहळा एका आगळावेगळा पणाने साजरा केला असून त्याची चर्चा सर्वीकडे होत आहे. मंगल परिणय सोहळ्यात वर- वधू ने जनजागृतीचे फलक घेऊन त्या संदर्भात नारे दिले. भारतीय संविधान, उद्देशिका, रक्तदान, वृक्षारोपण, जीवनात पाण्याचे महत्व अशा प्रकारचे जनजागृती बॅनर लावून लक्ष वेधले.
प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने दर तीन महिन्याला एकदा रक्तदान करावे. पर्यावरण संवर्धनाकरिता प्रत्येकाने वृक्षारोपण करावे. वाढते जल संकट जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यात यावी. राष्ट्रातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा विद्युत महा औष्णिक केंद्र चंद्रपुरात असताना
वीज उत्पादन जिल्हा करतो मग मोफत वीज हा आमचा अधिकार, रोजगार आमच्या हक्काचा आहे. पण स्टार्ट अप करून स्वतःचा व्यवसायला सुरुवात करणे हे सुद्धा बेरोजगारी कमी करण्याचे काम करण्यास कारण होईल. स्पर्धा परीक्षेत पोरांची फजगत करणे थांबवा, त्यातून गेलेला जीव कधी परत येणार नाही अशा प्रकारचे विविध जनजागृती चे फलक लावून आज वेगळ्या पद्धतीचा विवाह सोहळा अजय आणि ममता यांचा संपन्न झाला.
शेकडो लग्न सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांनी शुभ आशीर्वाद दिला.