चंद्रपुरात पुन्हा गुंडागर्दी,
रेती माफिया सक्रिय!
रेतीच्या वादावरून केलेल्या मारहाणीत जिल्हाप्रमुख संदीप गि-हेसह दोघांवर गुन्हे दाखल
तिघांनाही जामीन मंजूर !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांनी वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे रविवारी सायंकाळी धक्काबुक्की करून मारहाण केली.याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांना अटक करून चारचाकी वाहन जप्त केले. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे.
सविस्तर माहिती नुसार कंत्राटदार जितू चावला हे रेतीचा व्यवसाय करतात. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे त्यांना भेट घेण्यास बोलविले होते,चंद्रपूर शहरात विविध बांधकाम कामे करीत असलेल्या चावला यांना 'तुम्ही कमी दरात रेती का टाकता,' असा प्रश्न केला.
रेती तस्करीचे काम काही पक्षांच्या युवा राजकीय पदाधिकाऱ्यांकडून चंद्रपूर शहर व लागतच्या परिसरात जोमाने सूरू असून त्यांच्याकरवी इतर व्यवसायिकांना आमच्या भावानुसारच रेती टाकावी असा दबाव टाकण्यात येतो.
अश्याच प्रकरणात संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित व कंत्राटदार जितू चावला या चौघांमध्ये वाद झाला. गिऱ्हे, ठाकूर, बेले या तिघांनी चावला यांना धक्काबुक्की करीत जबरदस्त मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले.
रक्तबंबाळ झालेल्या चावला यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० कलमा अन्वेय १४३,१४७,१४९,२९४,५०६,३२३
गुन्हा दाखल करून तिघांनाही सोमवारी अटक केली. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मात्र जिल्हाप्रमुखाच्या वजनाखाली गिऱ्हे यांची गुंडागर्दी हा नेहमीचाच विषय पुन्हा चर्चेत आहे.
जिल्ह्यात रेती घाटावरील उत्खनन करणे बंद असताना
सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक करणे, बे भाव किमतीत रेतीची विक्री करणे अशा प्रकारचे मोठे रेती तस्कर सक्रिय आहेत. त्यामुळे आपापसातील गुंडागर्दी समोर येत आहे. असे प्रकार चंद्रपूर शहरात सर्रास सुरू आहेत.