पोंभूर्णा तालुक्यातील-आंबई तुकूम ते बोर्डा दिक्षी पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार ,कंत्राटदारावर कारवाईची मागणी




पोंभूर्णा तालुक्यातील-आंबई तुकूम ते बोर्डा दिक्षी पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार ,कंत्राटदारावर कारवाईची मागणी

पोंभूर्णा तातुक्यातील विकास कामाची पोलखोल

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (पोंभूर्णा)
पोंभूर्णा :- पोंभूर्णा तालुक्यात मागील चार दिवसापूर्वी संततधार पावसाने पुरपरस्थिती निर्माण झाली होती.आंबई तुकूम ते बोर्डा दिक्षीत पर्यंतच्या सहा किमी अंतराच्या डांबरीकरणाचा रोड आणि या रोडवर बनलेल्या नाल्यावरील पुलाच्या बांधकाम पहिल्याच संततधार पावसामुळे पुर्णपणे शतिग्रस्त झाले असून अनेक ठिकाणी भेगा पडले आहेत तर काही ठिकाणी रस्ता दबला आहे.कंत्राटदारानी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असून यात करोडो रुपयाचा भष्ट्राचार झाला आहे.रस्त्याच्या पुलाचे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याने रस्तावरील पुल पुर्णपणे उखडला काही ठिकाणी वाहुन गेला आहे.या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे जाणिपुर्वक दुर्लक्ष झाल्यामुळे कामाची कॉलिटी निष्कृष्ट दर्जाची वापरली गेली आहे.
सदर कामाची चौकशी करून बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारावर संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील आंबई तुकूम ते बोर्डा दिक्षीत फाटा या सहा किलोमीटरच्या डांबर रोडचे काम करण्यात येत आहे.१० कोटी रुपयांचे असलेले काम २०१९-२० मध्ये मंजूर झाले सदर काम हे साई कन्सट्रक्शन कंपनी चंद्रपूर यांना मिळाले आहे. याच रोडवर माहितीप्रमाणे पाच पुलाचे काम रामपाल सिंग या कंत्राटदारानी जवळपास 5 कोटी च्या वर लागत लावून या पुलाचे काम केल्याचे बोलले जात आहे. पुलावरील अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात बांधकामाची पोलखोल झाली आहे. कंत्राटदारांनी या रोडवर आणि पुुलाव निष्कृष्ट दर्जाचे काम केले हे पाहणी केली असता दिसून आले. या पुलामुळे बाजूला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कंत्राटदारांनी आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने भरपाई करून देण्याची मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.



जर या पुलाचे काम व्यवस्थित केले नाही त्या कंत्राट दारावर कारवाई केली नाही, संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. तर संजीवनी पर्यावरण संस्थेमार्फत आंदोलन करण्यात येईल असे राजेश बिले यांनी माध्यमांना सांगितले.
या कामात मोठा भष्ट्राचार करण्यात आला असून.यात पुल आणि रोड साठी अंतर्भूत असलेल्या मापदंडाला बाजूला सारून काम केल्याने पहिल्या पावसातच विकास कामाची पोलखोल खुलली असून पुर्ण पुलाचे बांधकाम आणि रोडच उखडल्याचे चित्र आहे.काही ठिकाणी पुर्ण डांबर रोड वाहून गेला आहे तर काही ठिकाणी मोठमोठे गड्डे पडले आहे.
भाजपाचे रामपाल सिंग हे पालकमंत्री ,आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्ती असून खंदे समर्थक असल्याचेही त्यांना इथले कामे कमिशन खोरीत दिले जात आहेत. म्हणून कामाला दुप्पट निधी देऊनही निष्कृष्ट दर्जाचे काम केले जात आहे.
घाईघाईने व अधिक फायदा मिळवण्यासाठी कंत्राटदाराने बांधकामाचे कोणतेच निकष न पाळल्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचे चित्र आहे.डांबर रोडचे झालेले काम या रोडवरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे व गुणवत्तापूर्ण नसलेले काम करून शासनाच्या निधीवर बोगस काम करून डल्ला मारले असल्याने संबंधित कामाची चौकशी व गुण नियंत्रण विभागाकडून तपासणी करून संबंधित कंत्राटदाराला काळ्यायादीत टाकावे यापूर्वी जिथे जिथे काम झाले त्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राळदारावर कारवाई करण्याची मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.