पोंभूर्णाण्यातील विकास कामाची पोलखोल,
पहिल्याच पावसात अख्खा डांबररोड उखडला
निकृष्ट दर्जाचे काम : कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
-आंबई तुकूम ते बोर्डा दिक्षीत रोड कामात मोठा भ्रष्टाचार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर - (पोंभूर्णा)
पोंभूर्णा :- पोंभूर्णा तालुक्यात मागील चार दिवसापूर्वी संततधार पावसाने पुरपरस्थिती निर्माण झाली होती.आंबई तुकूम ते बोर्डा दिक्षीत पर्यंतच्या सहा किमी अंतराच्या डांबरीकरणाचा रोड पहिल्याच संततधार पावसामुळे पुर्णपणे उखडला असून अनेक ठिकाणी भेगा पडले आहेत तर काही ठिकाणी रस्ता दबला आहे.कंत्राटदारानी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असून यात करोडो रुपयाचा भष्ट्राचार झाला आहे.रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याने रस्ता पुर्णपणे उखडला आहे.या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे जाणिपुर्वक दुर्लक्ष झाल्यामुळे कामाची पत खराब झाली आहे.सदर कामाची चौकशी करून बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील आंबई तुकूम ते बोर्डा दिक्षीत फाटा या सहा किलोमीटरच्या डांबर रोडचे काम करण्यात येत आहे.१० कोटी रुपयांचे असलेले काम २०१९-२० मध्ये मंजूर झाले सदर काम हे साई कन्सट्रक्शन कंपनी चंद्रपूर यांना मिळाले आहे.कंत्राटदारानी रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे.यात मोठा भष्ट्राचार करण्यात आला असून.यात रोड साठी अंतर्भूत असलेल्या मापदंडाला बाजूला सारून काम केल्याने पहिल्या पावसातच विकास कामाची पोलखोल खुलली असून पुर्ण रोडच उखडल्याचे चित्र आहे.काही ठिकाणी पुर्ण डांबर रोड वाहून गेला आहे तर काही ठिकाणी मोठमोठे गड्डे पडले आहे. याच रोडवर मोठमोठे पूल बांधण्यात आले आहे. त्या पुलाची कॉलिटी अत्यंत खालच्या दर्जाची झाली आहे. ते पूल रामपाल सिंग या कंत्राटदाराने बनवल्याचे समोर येत आहे. रामपाल सिंग पालकमंत्री ,आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा यांचे निकटवर्ती असून खंदे समर्थक असल्याचेही त्यांना इथले कामे कमिशन खोरीत दिले जात आहेत. म्हणून कामाच्या दुप्पट निधी देऊनही निष्कृष्ट दर्जाचे काम केले जात आहे.
घाईघाईने व अधिक फायदा मिळवण्यासाठी कंत्राटदाराने बांधकामाचे कोणतेच निकष न पाळल्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचे चित्र आहे.डांबर रोडचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे व गुणवत्तापूर्ण नसलेले काम करून शासनाच्या निधीवर निधीवर बोगस काम करून डल्ला मारले असल्याने संबंधित कामाची चौकशी व गुण नियंत्रण विभागाकडून तपासणी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पोंभुरण्यातील नगरपंचायतच्या व्हाइट हाऊस चे सभागृहाचे छप्पर, नगरपंचायत सभागृहाचे छत कोसळले
पोंभुर्णा :-
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाचे महामेरू सुरू केले. जिल्हाच्या विकासासह आपल्या विधान परिषदेत क्षेत्रातला विकास व्हावा या दृष्टिकोनातून मुबलक दुप्पट निधी नगरपंचायतीला उपलब्ध करून दिला. नऊ कोटी 99 लाख रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीच्या बांधकावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. ही सूजसज्ज इमारत'व्हाइट हाऊस' या नावाने जिल्ह्यात लौकिक मिळवले. मात्र या नगरपंचायत कार्यालयाचे सभागृह प्लास्टर ऑफ पॅरिस'(पिओपी) करण्यात आली. मात्र एकाच पावसात या नगरपंचायत च्या सभागृह छप्पर अल्पावधीतच कोसळल्याने पूर्ण पोलखोल खुलली.
त्यालाच लागून असलेले नगरपंचायत चे सभागृह 2020 मध्ये याचे लोकार्पण झाले. चार कोटीच्या वर लागत लावून बांधलेल्या या सभागृहाचे छत कोसळले. ते सभागृह नगरपंचायतीने एका महिला आर्थिक विकास( माविस) चंद्रपूर व लोकर संशोधन संघ(WRA) मुंबई यांना किरायाच्या बेसवर देण्यात आले. अवघ्या तीन वर्षात या सभागृहाचे छप्पर( पीओपी) कोसळले. या सभागृहाच्या स्टाईल सुद्धा शतिक ग्रस्त झाले असून पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहेत. कार्पोरेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्रात महिला या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून काम करतात. केव्हा राहिलेले छत कोसडेल याचा अंदाज नाही. या भीतीने काम सुरू आहे. या प्रकारचे विकासाचे काम
पोंभुर्णात मुख्याधिकाऱ्याचे कॉटर, पोलीस स्टेशन, व्यायाम शाळा, संताजी सभागृह, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके सभागृह, महात्मा फुले सभागृह, बांधण्यात आले आहेत. या सभागृहाला एकाच पाण्याने गळती लागल्याने संबंधित अभियंता, कंत्राटदाराच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या कंत्राटदारावर कारवाई करून त्यांना काळ्यायादीत टाकण्याची मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.