चंद्रपुरातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सरबेरे दाम्पत्यांचा
शोधनिबंधाची जागतिकस्तरावर दखल
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती सरबेरे यांनी इस्केमिक हृदयरुग्णावर केलेल्या रिसर्चची जागतिक दर्जाच्या एशियन जनरल ऑफ कार्डिओलॉजी रिसर्चमध्ये नोंद करून हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. सरबेरे यांनी रशिया येथे झालेल्या चौथ्या इंटरनॅशनल कॉर्डिओलॉजी परिसंवादात हा शोधनिबंध सादर केला होता. एशियन जनरल ऑफ कॉर्डिओलॉजी रिसर्चमध्ये देशविदेशातील हृदयरोगावरील रिसर्च पेपर प्रसिद्ध होत असतात. चंद्रपुरातील डॉक्टर दाम्पत्याच्या रिसर्चची या संस्थेने दखल घेतल्याने चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२० च्या सर्वेक्षणानुसार भारतात हृदयरोगामुळे होणारे मृत्यूदर हे २८.१ टक्के आहे. अलीकडेच
केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आयसीएमआर रिपोर्टनुसार भारतात फक्त हॉर्ट अटॅकमुळे होणारे मृत्यूदर २८ टक्के असल्याचे सांगितले असून, ही फार चिंताजनक बाब असल्याचे डॉ. सरबेरे, डॉ. राहुल मंडोले आणि प्रीती सरबेरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. सरबेरे यांनी इस्केमिक हृदयरुग्णाची वारंवार हॉस्पिटलची गरज आणि मृत्यूदर कमी होण्यासाठी संशोधन सुरू केले होते. ज्यात रुग्णांच्या सुरुवातीचे रिपोर्ट व चिकित्सेनंतरचे रिपोर्ट याची माहिती गोळा करून त्याचा अहवाल तयार केला. या अहवाल आणि रुग्णांवर त्यांनी संशोधन केल्यानंतर रुग्णांच्या हृदयाकडील रक्तपुरवठा चमत्कारिकरित्या वाढलेला दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी काही हृदय आजारातून बरे झालेले रुग्णही उपस्थित होते.