सुभाष कासनगोट्टूवार यांच्या त्या बॅनरबाजी मुळे दैवताच्या "भक्ती"वर प्रश्नचिन्ह!
आम. बंटी भांगडिया यांच्या जन्मदिनाच्या फ्लेक्स वरून चर्चेला पेव !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
चिमूर चे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहे. सध्या या बॅनरवर सुधीर मुनगंटीवार यांचे निष्ठावान समजले जाणारे व सुधीर मुनगंटीवार माझे दैवत आहे. असे म्हणणारे सुभाष कासनगोट्टूवार यांच्या छायाचित्रासह मोठ-मोठे फ्लेक्स शहरांमध्ये इलेक्ट्रिक पोलवर झळकत असल्यामुळे आता कुठे गेली भाऊ सोबत चे "निष्ठा" असे प्रश्न शहरांमध्ये चर्चिल्या जात आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी जाहीर केली यामध्ये चंद्रपूर शहर अध्यक्ष पद माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे शहराध्यक्षपद देण्यात आले. राहुल पावडे यांच्यावर पक्षाने दाखविलेला विश्वास सुभाष कासनगुटवार यांना जीव्हारी लागल्याची चर्चा शहरांमध्ये होऊ लागली आहे आणि त्यात तथ्यही आहे. राहुल पावडे हे प्रारंभी सुभाष कासनगुटवार यांच्या विश्वासातले म्हणून त्यांची ओळख होती परंतु आपल्या कार्यशाळेमुळे व तत्परतेमुळे राहुल पावडे यांनी नेत्यांच्या विश्वास संपादित करीत आपल्याकडे खेचून आणलेले विविध पदे, पक्षाचे पद काही भाजप पदाधिकाऱ्यांना खटकत असल्यामुळे कासनगोट्टूवार यांच्या दुखावलेला "इगो" बाहेर आल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. आमदार बंटी भांगडिया हे भाजपचे आहेत. परंतु पक्ष स्तरावर त्यांच्या अपेक्षा या मोठ्या आहेत, त्यामुळे त्यांनी जिल्ह्यात आपला वेगळा गट स्थापित करण्यासाठी प्रयत्न चालविली असून त्या प्रयत्नांची पहिले पाऊल म्हणूनच त्यांनी त्यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्याच्या मुख्यालयात आपल्या जन्मदिनानिमित्त मोठे मोठे फ्लेक्स लावून याच्या श्रीगणेशाही केल्याचे सांगण्यात येत आहे. या फ्लैक्स बॅनर मध्ये सुभाष कासनगुटवार यांच्या लागलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रारंभीच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळचे म्हणून सुभाष कासनगोट्टूवार जिल्ह्यात ओळखले जायचे. त्यानंतर कुठे माशी शिंकली हे कळाले नाही आणि पक्षाच्या वरिष्ठांनी कासनगोट्टूवार यांना हळूहळू दूर सारणे सुरू केले, हीच बाब कासनगोट्टूवार यांना खटकायला लागली. यापूर्वी एका प्रादेशिक वर्तमानपत्राने कासनगोट्टूवार यांच्या "किमया" प्रकाशित केल्यानंतर वरिष्ठांकडे त्यांची पत घसरली व त्यांचा बडबोलेपणा हाच त्यांच्यासाठी घातक ठरला अश्याही चर्चा यानिमित्ताने होऊ लागल्या आहे. सुधीर भाऊ हे माझे दैवत आहेत असे खुलेआम सांगणारे कासनगोट्टूवार यांनी एवढ्या लवकर आपले दैवत बदलवित आपली 'भक्ती" भांगडिया यांच्या पलड्यात झोकली, या चर्चेला आता शहरात पेव फुटला आहे.
दिनचर्या न्युज