अखेर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांची पदोन्नती, घंटानांद आंदोलनाची घेतली दखल!
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण मंडळातील यवतमाळ जिल्हा हा अमरावती जिल्ह्यात परिवर्तित करण्याच्या हालचाली सुरू! 'त्या' आंदोलनाचा दणका!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर प्रदूषण विभागात मनुष्यबळ नसल्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा पालकमंत्री विरोधात घंटानांद आंदोलन राजेश वा. बेलेसंस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था त्यांच्यामार्फत करण्यात आले होते. त्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा प्रादेशिक अधिकारी म्हणून तानाजी यादव यांची पदोन्नती करण्यात आली असून. या अगोदरचे प्रभारी असलेल्या प्रादेशिक अधिकारी देशपांडे मॅडम यांना नागपूर देण्यात आले आहे.
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण मंडळातील यवतमाळ जिल्हा हा अमरावती जिल्ह्यात परिवर्तित करण्याच्या हालचाली सुरू! 'त्या' आंदोलनाचा दणका!
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालया अंतर्गत येणारे जिल्हे चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा येत असते वेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यलयात फक्त एक उपप्रादेशिक अधिकारी यांच्या रामभरोश्यावर तीन जिल्हयाच्या कामाची जिम्मेदारी असल्यामुळे प्रदुषण ग्रस्त जिल्हयातील प्रदुषण कमी करण्याकरीता उपाय योजनेसाठी मुनष्यबळ आवश्यक आहे. प्रदुषणाच्या टक्केवारी मध्ये चंद्रपूर जिल्हा भरता मध्ये चौथ्या क्रमांकावरती, महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावरती तसेच यवतमाळ जिल्हयामध्ये पण खुप मोठया प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. गडचिरोली जिल्हयामध्ये पण लोह खनिज, आर्यन प्लॉन्ट, चुनखडी खानी, सिमेंट प्लॉन्ट सुरु झालेले आहे. तरी सुध्दा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालयात मनुष्यबळ नसल्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा पालकमंत्री यांच्या तिव्र निषेधांत घंटा नाद आंदोलन करण्यात आले होते. जिल्ह्यात प्रादेशिक अधिकारी कायमस्वरूपी मिळावे अशा प्रकारची मागणी
संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वा. बेले यांनी केली होती.