ना. सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या वाढदिवसा निमित्त बिडीओ धनंजय साळवे यांचे सलग 39 वे रक्तदान
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, विकास पुरुष , राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिवसा प्रित्यर्थ जिल्ह्यात पालकमंत्री महारक्तदान यज्ञ. आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सहभाग दर्शविणारे
आतापर्यंत 39 वेळा रक्तदान करणारे धनंजय साळवे, गट विकास अधिकारी,पंचायत समिती गडचिरोली यांनी रक्तदान केले.
स्वतः6 वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन
साहित्य क्षेञात लोकांत वाचनाची आवड निर्माण करण्याकरीता विविध कवि/साहित्य सम्मेलनाचे आयोजन करण्यात अग्रेसर असणारे त्यांनी आज सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान यज्ञात सभाग दर्शवून रक्तदान केले. चला आपण समाजकार्यात वाहून घेऊ या , असा सामाजिक संदेश देत वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रणी असलेले धनंजय साळवे यांनी 39 वेळा रक्तदान देऊन सामाजिक दायित्व निभवत आहेत.
याबद्दल त्यांना अनेक क्षेत्रातून अशा कार्याबद्दल अभिनवाचा वर्षाव होत आहे.