नदीचे लिलाव झालेले सर्वे नंबर सोडून! दुसऱ्या सर्वे नंबरातील रेतीची उपसा करून साठवणूक!




नदीचे लिलाव झालेले सर्वे नंबर सोडून! दुसऱ्या सर्वे नंबरातील रेतीची उपसा करून साठवणूक!

साठवणूक केलेली रेती कुणाची? हे या परिसरातील शेतकऱ्यांना चांगलेच माहित आहे.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मुल मार्गावरील अजयपुर जवळील अंधारी नदीवर एका शेतशिवारात हा रेतीचा साठा पावसाळ्यापूर्वी अवैधरित्या जमा करून ठेवण्यात आला आहे. नदीपात्रातील सर्वे नंबर 149 ,140, 142 या ठिकाणाहून नियमानुसार रेतीचा उपसा जेसीपी न करता मजूरदारांनी करायचे आहे. तीन फूट खोलीकरणापर्यंत खोदायचा होता. परंतु येथील रेती तस्करांनी सर्वे नंबर 163, 164 165, या नदीपात्रातील रेतीचा अवैध्यरीत्या उपसा केला आहे. ग्रामपंचायतीकडे वरील सर्वे नंबर याची माहिती असून बाकी सर्वे नंबरची कधी लिलाव झाली अशी माहिती उपलब्ध नसून परस्पर लिलाव केल्याचे अधिकाऱ्याकडून बोलले जाते. एकदा लिलाव झालेल्या सर्वे नंबरच्या नदी पात्रातून रेतीचा उपसा करायचा असताना जेसीपी लावून अँवध्यरित्या नदी पात्रातून रेती उपसून साठवणूक केल्याचे दिसून येते.
मागील वर्षी सुद्धा या नदीपात्रातून अवैधरीत्या आठ ते दहा फुटापर्यंत खोलीकरण केल्याने अनेक जनावरे या ठिकाणी नदी पात्रात मरण पावली .

नियमाला धाब्यावर ठेवून नदीचे खोलीकरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर पंपाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही. एवढेच नाही तर या उत्खनामुळे प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र याकडे खनिकर्म अधिकारी, महसूल अधिकारी यांनी आपल्या डोळ्यावर गंधारी सारखी पट्टी बांधल्याचे दिसून येत आहे. सर्रास रात्र ला रेती उत्खननाचा खेळ नदी घाटावर होत आहे.


एवढेच नाही तर केळझर येथील एका रेती तस्कराने आपल्या शेतीमध्ये 40 ते 60 हायवा माती आणून आपल्या शेतामध्ये टाकली गेल्याची चर्चाही या परिसरात होत आहे. मात्र तीन दिवस सतत मातीचा उपसा होत असताना येथील महसूल अधिकारी साधी मोजमापही त्याच्या शेताची करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता याकडे चंद्रपूर तहसीलचे नवीन तहसीलदार पवार साहेब, तसेच एसडीओ कारवाई करतील का? असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.