सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बगीच्यामध्ये अनेक नागरिक सकाळी पाच वाजता पासून मॉर्निंग वॉक साठी येत असतात. यात महिला, पुरुषांचे लहान मुलांचाही समावेश असतो.मध्यभागी असलेल्या आझाद बगिच्याचे कंत्राट नागपुरातील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे, या बगीच्याचे संपूर्ण कामकाज चंद्रपुरातील संकेत चिंचेकर हे बघतात.
मनपा प्रशासनाने बगीचाची जबाबदारी कंत्राटदाराला दिल्याने येथील अनेक समस्या निर्माण झाले आहेत. बगीच्यातील व्यवस्था तर सोळाच येथे आता महिला सुरक्षित नसून या बगिच्यात चोरीचे प्रकार आता वाढू लागले आहे.
16 जूनला सकाळी गाडीच्या डिक्कीतून 13 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने पळविल्याची धक्कादायक बाब आज उघडकीस आली.यामुळे बगीच्यातील सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळी नेहमीप्रमाणे मीनाक्षी अलोने यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक MH34BY5523 पार्किंग मध्ये ठेवली त्यांनतर जवळ असलेल्या पैश्याची बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली मात्र परत आल्यावर ती बॅग अज्ञाताने चोरल्याचे लक्षात आले. त्यानंतर मीनाक्षी अलोने यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
विशेष म्हणजे सकाळी 6.30 ते 7.30 वाजेदरम्यान जेव्हा ही बाब उघडकीस आली त्यावेळी नागरिकांनी बगीच्यामधील असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी सीसीटीव्ही बंद होते.
घडलेल्या या प्रकारावर बगीच्यात येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत बगीच्यात येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आता रामभरोसे असल्याचे सांगत त्याचे संपूर्ण खापर कंत्राटदारावर फोडले आहे.
आजच्या घडलेल्या प्रकाराबद्दल संकेत सोबत सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की बगीच्यात असे प्रकार जेव्हा घडले त्यावेळी आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतो, मात्र रात्र पाळीत असलेल्या सुरक्षा रक्षकाने घरी जात असताना चुकीने बगीच्या बाहेरील असलेले स्विच ऑफ केले त्यामुळे सीसीटीव्ही बंद झाले होते.आणि त्यातच हा प्रकार घडला. असे बोलले जात असले तरी आझाद बगीच्यातील सुरक्षेच्या प्रश्न दिवसानं दिवसा गंभीर होत असल्याची बाब समोर येत आहे.