देशभरात मोदी@9 महाजनसंपर्क अभियान 30 मे ते 30 जून पर्यंत राबवणार - हंसराज अहिर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
2024 हे वर्ष निवडणुकांचे असल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरामध्ये मोदी@9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात लोक कल्याणकारी योजना, धाडसी निर्णय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उज्ज्वल करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कामगिरी गावा-गावात प्रसार करण्याचे योजिले आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना हंसराज अहीर यांनी भाजपाच्या सेवा, सुशासन, गरिब कल्याण भुमिकेची स्पष्ट माहीती दिली. यावेळी मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3.5 करोड़ पेक्षाही जास्त कुटूंबाना पक्के घरे ग्रामीण भागात सन 2023 पर्यंत 100 टक्के शौचालयाचे उद्दीष्ठ गाठल्याचे यश, 12 करोड लोकांच्या घरामध्ये नळातून स्वच्छ पेयजलाची व्यवस्था, 9.6 करोड कुटूंबियांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध, कोविड संक्रमण काळात 80 करोड पेक्षा अधिक नागरिकांना अन्नधान्य मोफत दिले, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, मोदींच्या राजवटीत युरीया तसेच अन्य खतांच्या किंमती स्थिर, जागतिक स्तरावरील पहिल्या सुक्ष्म द्रव 5. युरिया प्रकल्पाची उभारणी मोदी सरकारनी केली. केंद्र सरकारने आर्थिक गरजांवर आधारीत धोरणांनुसार आर्थिक दुर्बल घटकांकरिता 10 टक्के शैक्षणिक आरक्षण. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा. देशातील दिव्यांगांची होणारी सामाजिक उपेक्षा लक्षात घेता दिव्यांग प्रवर्गात वाढ करित 7 वरून 21 आजार समाविष्ट करण्यात आले. मागील 9 वर्षात मोदी सरकारने देशात 74 नविन विमानतळाची उभारणी केली. 53868 किमी लांबीचे नविन राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले. सन 2014 पर्यंत देशात जलमार्गाची प्रगती शुन्यावर होती मागील 9 वर्षाच्या मोदी सरकारमध्ये 111 नवीन जलमार्गाची बांधणी केली. सामान्य भारतीयांच्या स्वप्नातील जागतीक दर्जाची अत्याधुनिक रेल्वे सेवा वंदे भारत एक्सप्रेस च्या माध्यमातून मोदी सरकारने देण्याचा प्रयत्न केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 700 च्या वर पोहचली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये 9 वर्षात 69663 जागांमध्ये वाढ झाली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश आर्थिक संपन्न, विकास, उत्पादकता, अंतर्गत व सिमा सुरक्षेतेत यशस्वी ठरले. अशी माहिती
मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने दि. 04 जुन, 2023 रोजी - चंद्रपूर लोकसभा क्षेत्र महाजनसंपर्क अभियानाचे संयोजक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शहरातील हॉटेल मयुर च्या सभागृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले . पत्रपरीषदेला ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. डॉ संदीप धुर्वे, भाजपा चंद्रपूर अध्यक्ष (ग्रा) देवराव भोंगळे, माजी आमदार अॅड संजय धोटे, सुदर्शन निमकर, ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, हरिष शर्मा, तारेंद्र बोर्डे, अहतेशाम अली, राजेंद्र डांगे, दिनकर पावडे, भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, रवि बेलुरकर, गजानन विधाते, रवि गुरूनुले, ब्रिजभूषण पाझारे, विजय पिदुरकर, संध्याताई गुरनुले, विपीन राठोड, डॉ. एम. जे. खान आदींची उपस्थिती होती.
सरकार महागाईवर नियंत्रण करण्यास असफल झाले का ?
.याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या राष्ट्रव्यापक प्रश्नांची काही व्यापक उत्तरे देऊन पत्रकारांचे समाधान करण्याचे प्रयत्न केले.
मागील नव वर्षात मोदीजींनी केलेल्या कामाचा गोषवारा आज पत्रकार परिषदेत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर त्यांनी वाचून दाखवला. मात्र सरकार महागाईवर नियंत्रण आणण्यास असफल ठरल्याचे प्रश्न विचारले असता. अनेक प्रश्नांना बगल देण्यात आले. सरकारने पेट्रोल ,डिझेल, गॅस, विद्युत, सर्वसामान्यांना देण्यात आलेल्या आवास योजना, अमृत योजनेचे तीन तेरा, आयुष्मान भारत योजना, काळा पैसा, सर्वसामान्यांना घरकुल पट्टे, महागाईचा कळस, सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. मग मोदी सरकारने अच्छे दिवस कुणासाठी आणले, तर ते उद्योगपतीसाठी आणल्याची खंत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दिनचर्या न्युज