लोकशाही मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी सैनिक सेलची राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी, राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनात महा प्रबोधन यात्रेचे आयोजन पुणे येथून 10 फेब्रुवारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून दीडशे तालुक्यातून ही यात्रा नवयुवक, राष्ट्रवादीचे सैनिक, माझे सैनिक यांच्यत जनजागृती करून, महापुरुषांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे व लोकशाही मजबूत करण्यासाठी राज्यभर राज्यव्यापी महा प्रबोधन यात्रा काढण्यात आली आहे. अशी माहिती आज चंद्रपुरात पत्रपरिषद जनता महाविद्यालयात घेण्यात आली यावेळी माजी सैनिक सेल विभागाचे प्रदेश अध्यक्ष दीपकराजे शिर्के, शाहू चरित्र अभ्यासक व्याख्याते एड. संभाजीराव मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पेठे, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, जेष्ठ नेते अशोक जीवतोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पूजाताई शेरकी, माजी सैनिक सेल भंडारा जिल्हाध्यक्ष नागेश भगत, भंडारा संयोजक नितेश शामकुंवर यांची उपस्थिती होती.
जय जवान जय किसान या नाऱ्याची आज देशात अवहेलना होत आहे. शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे तर माजी सैनिकांनाही न्याय मिळत नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाचे सर्वे सर्वां शरद पवार यांच्या नेतृत्वात माजी सैनिक सेल ची स्थापना करण्यात आली यात माजी सैनिकांना संघटित करने व विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचाराने प्रेरित करण्यासाठी राज्यभर राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा सुरू आहे .
आज देशभरात भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून शेतकरी व सैनिकांची अवहेलना सुरू आहे, शेतकऱ्यांना सतत 8 महिने आंदोलन करावे लागले तर माजी सैनिकांचीही दयनीय अवस्था झाली आहे. असा आरोप दिपकराजे शिर्के यांनी केला.
पुढे शिर्के म्हणाले की शरद पवारांनी संरक्षण मंत्री व कृषी मंत्री असतांना किसान व जवान या दोन्ही वर्गांना योग्य न्याय दिला परंतु विद्यमान भाजपा सरकार यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, कोणी विरोधात बोलले की त्यावर चौफेर आघात करण्यात येतो. भाजप सरकार सैनिक व शेतकऱ्यांचे हितकारक असल्याचा देखावा करत आहेत याचे पितळ उघडे पाडण्याचे कार्य या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ही शिर्के म्हणाले.
अग्निविर योजना देशासाठी घातक
अग्निप्पथ योजना ही सपशेल चुकीची योजना आहे, येणाऱ्या काळात देशाच्या सुरक्षेकरिता अनुभवी सैनिकांची उणीव जाणवणार आहे.
अल्पावधीकरिता नेमणूक करण्यात येणाऱ्या जवानाला सेवा दिल्यानंतर रोजगाराकरिता पुन्हा धडपळ करावी लागणार त्यावेळी त्यांचे वय निघून जाणार सोबतच तो एक कंत्राटदार सैनिक म्हणून काम करणार, त्यामुळे तो असामाजिक तत्वांच्या हाती लागू शकतो त्यामुळे अग्निवीर योजनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध.
शाहू अभ्यासक व्याख्याते एड संभाजीराव मोहिते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजमनावर रुजवणे ही येणारी पिढी घडवण्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे राज्यातील महाविद्यालयिन विद्यार्थ्यांना अराजकीय माध्यमातून महापुरुषांचे विचार रुजविण्यात येणार असल्याची माहिती दिली.