चंद्रपुरात निघाली तृतीयपंथीयांची प्राऊड रूट मार्च !chandrapur




चंद्रपुरात निघाली तृतीयपंथीयांची प्राऊड रूट मार्च !

दिनचर्या न्युज 
चंद्रपूर :- २५/२/ २०२३ 
संबोधन ट्रस्ट आजाद  चंद्रपूर त्यांच्या वतीने  तृतीयपंथीयांची प्राऊड मार्च राँली  दिनांक 25/2/2023 ला शासकीय रुग्णालयातून काढण्यात आली. तृतीयपंथी व देहय विक्री करणाऱ्या महिलांचे  समाजात स्थान निर्माण व्हावे. त्यांच्याकडे समाजाच्या पाहण्याच्या भावना ह्या समान असाव्या. आम्हालाही समाजात आपल्यासारख्या सन्मानाने जगनाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी आज तृतीयपंथीयांनी प्राऊड रूट मार्ग काढून पहिल्यांदाच महाराष्ट्रात त्यांच्याकडून अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली असल्याचे सांगितले गेले.  प्रेम असत,' तुमच आमच सेम असत' अशा प्रकारचे फलक लावून नारे देत होते. 
या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविले असल्याचे दिसून आले. तृतीयपंथीयांचे अधिकार घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी या रूट मार्चमध्ये तृतीयपंथी आणि सहभाग दर्शवला होता.