23 फेब्रुवारीला २८ वा ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवस, विविध महत्वपूर्ण योजनाची जनजागृती..




23 फेब्रुवारीला २८ वा ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प 'स्थापना दिवस' विविध महत्वपूर्ण योजनाची जनजागृती....

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथे 28 वा ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवस दिनांक 23 फेब्रुवारी 2023 ला दुपारी बारा वाजता स्थळ प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी
मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, चंद्रपूर व गोंदिया जिल्हा,
सन्माननीय मा.खा.श्री. अशोक नेते गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र,
मा.खा.श्री. बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर चंद्रपूर वणी आण लोकसभा क्षेत्र,
मा.आ.श्री. रामदास आंबटकर
विधान परिषद सदस्य, चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक प्राधिकरण संस्था
मा.आ.श्री. अभिजित वंजारी
विधान परिषद सदस्य, पदवीधर मतदार संघ, नागपूर विभाग,
मा.आ.श्री. सुधाकर अडबाले
विधान परिषद सदस्य, शिक्षक मतदार संघ, नागपूर विभाग,मा.आ.श्री. विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र,मा.आ.श्री. कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र,मा.आ.श्री. सुभाष धोटे राजुरा विधानसभा क्षेत्र,मा.आ.श्री. किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र,
मा.आ.श्रीमती प्रतिभाताई धानोरकर वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र , यांची उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून
मा.श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी (भा.प्र.से.) प्रधान सचिव (वने), महाराष्ट्र शासन
मा. डॉ. वाय. एल. पी. राव (भा.व.से.) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य
मा.श्री. एम. एस. रेड्डी (भा.व.से.) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर
मा.श्री. प्रकाश लोणकर (भा.व.से.) मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर
मा. श्री. विनय गौडा जी.सी. (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, चंद्रपूर
मा. श्री. विवेक जॉनसन (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर
मा. श्री. रविंद्रसिंह परदेशी (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक, चंद्रपूर
झालेल्या पत्रकार परिषद मधून
डॉ. जितेंद्र रामगावकर (भा.व.से.)
क्षेत्र संचालक तथा वन संरक्षक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील मानव प्राणी संघर्ष टाळण्यासाठी विविध स्तरावर महत्वपूर्ण उपायोजना आखण्यात आले आहेत.
• व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचा (EDC) सत्कार व पर्यटन महसुलातील भागाचे थेट धनादेशाने वितरण.
• उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक बचाव दल (PRT) यांना पुरस्कार वितरण.
• बफर क्षेत्रातील 10वी व 12वी वर्गातील विद्यार्थ्यांना संगणक वितरण.
• वनक्षेत्रालगतचे शालेय मुलींना सायकलचे वितरण.
• उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार वितरण.
• उत्कृष्ट होम स्टे पुरस्कार वितरण.
ग्रीन रिसॉर्ट पुरस्कार वितरण.
• सांस्कृतिक कार्यक्रम
लोकसभागातून मानव प्राणी संघर्ष व उपायोजना. डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जन वन योजना क्षेत्रात 92 गावांमध्ये ही योजना 2015 पासून राबवण्यात येत आहे. संरक्षण व संवर्धन या माध्यमातून वने व वन्य जीवाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. आणि ती जबाबदारी वन अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे पार पाडतात. मानव प्राणी संघर्षातून टाळण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जाणीव जागृती उपक्रम राबविण्यात येत असतात. निसर्ग शिक्षणातून व वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्याकरिता पर्यावरण जन जागृती शिबिर घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. शाश्वत व ऐच्छिक पुनर्वसन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर वन क्षेत्रातील पाच गावांचे यशस्वी पुनर्वसन झाले आहेत. रान तळोदी या गावाचे पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून क्षेत्रसंचालक
तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.