समाजाच्या शिक्षित महिलांनी नाभिक महापुरुषांचे कार्य समाजा समोर आणा! सौ.राजश्री विरूळकर. नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र तर्फे हळ कुंकू, महिला मेळावा व नाभिक समाजातील गुणवंत महिलांचा सत्कार





समाजाच्या शिक्षित महिलांनी नाभिक महापुरुषांचे कार्य समाजा समोर आणा! सौ.राजश्री विरूळकर

नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र तर्फे हळ कुंकू, महिला मेळावा व नाभिक समाजातील गुणवंत महिलांचा सत्कार


दिनचर्या न्युज :-
नागपूर :-
नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र तर्फे हळ कुंकू, महिला मेळावा व नाभिक समाजातील गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.राजश्री विरूळकर होत्या. *नाभिक महिलांनी संघटीत होऊन समाजाच्या मागन्या करता संघर्ष करावा* . नाभिक महिला विविध क्षेत्रात प्रगतीशील कामगिरी करत आहे समाजाचे नाव लौकीक करत आहे.समाजाच्या शिक्षित महिलांनी नाभिक महापुरुषांचे कार्य समाजा समोर आणायला पाहिजे . नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्री नगाजी महाराज यांचे (जन्म स्थळ) मंदिर पारडी ता.हिंगणघाट जि.वर्धा येथे समाजबांधवांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी जेणेकरून मंदिराला (अ) दर्जा प्राप्त होईल . महिलांनी योग्य प्रक्षिशण घेऊन ब्युटीपार्लर व्यवसाय सुरू करावा.असे मत त्यानी व्यक्त केले . या वेळी विदर्भातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व सौ.भाग्यलता तळखंडे, सुधा ईरसकर,गंधर्वां लाडगे,संगिता पारधी, किरण अतकर,शरयु रगतसिंगे,धनश्री एकवनकर,नुपूर देवळीकर,वनश्री फुलबांधे,वैशाली एकवनकर, अर्चना आबुलकर , छाया माडवकर,बेबी नागतुरे,ज्योती नक्षिणे,सरिता वर्दिलवार,शोभा वाटकर,पुष्पा नक्षिणे,सोनाली विरुळकर,अमृता एकवनकर, कविता लिंगे, महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ.अल्का वाटकर अध्यक्षा चंद्रपूर जिल्हा नाभिक महिला शक्ती महाराष्ट्र यानी केले . कार्यक्रमा करिता नाभिक युवा शक्ति महाराष्ट्र च्या सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली . ज्यानी या कार्यक्रमाला तन,मन,धनानी सहकार्य केले अश्या सर्वाचे आभार प्रर्दशन करताना कु.श्रद्धा लक्षणे यांनी आभार मानले . असेच सहकार्य नेहमीच आम्हाला लाभत राहो धन्यवाद!
कु.श्रद्धा लक्षणे
सोशल मिडीया प्रमुख नाभिक महिला शक्ती महाराष्ट्र