दुर्गापुर ग्रामपंचायत अतिक्रमीत जमिनीचा प्रश्न
नितिन भटारकर यांच्या सततच्या प्रयत्नाने सुटला
दुर्गापुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. ०३ येथील जागेच्या मोजनी संदर्भात १२ लाख रुपये भरण्याचा प्रश्न सुटला कायमस्वरूपी.
मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी म. रा. पुणे यांच्या सूचनेनुसार विशेष बाब म्हणून मोजणी शुल्कात तब्बल ६ लाख रुपयांची देण्यात आली सूट.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- तहसिल जिल्हा चंद्रपूर येथील दुर्गापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र. ०३ येथील मानिव गावठाण म्हणून सण २०१९ ला महाराष्ट्र शासनाने संपादीत केलेल्या अतिक्रमीत जमिनीचा रेंगाळत असलेला अभिन्यास जिल्हा प्रशासनाने तयार करून द्यावा याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर व माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मेश्राम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर जागेच्या मोजणी शुल्काबाबत चा प्रश्न कायमस्वरूपी सुटला.
सदर जागेचा मोजनीचा प्रश्न सूटावा याकरिता जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मेश्राम यांनी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार व संपर्कमंत्री प्राजक्त तनपूरे साहेब यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत विस्तृत निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांनुसार दिनांक २८ जून २०२१ व दिनांक ०६ जानेवारी २०२२ ला मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली २० कलमी सभागृह येथे संबंधित सर्व अधिकार्यांची बैठक झाली होती. व त्या बैठकीत विशेष बाब म्हणून मोजणी संदर्भात लागणाऱ्या एकूण १२ लाख रुपयांचे ५०% म्हणजेच ६ लक्ष रुपये ग्रामपंचायत दुर्गापुर तर्फे मा. उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक १६/०२/२०२२ ला चालान द्वारे भरण्यात आले होते.
तहसील जिल्हा चंद्रपूर येथील मौजा दुर्गापुर वार्ड क्रमांक ०३ येथील सर्वे क्रमांक १६८ व १६९ (नवीन सर्वे क्रमांक ८६, ८७, ८८, ८९) २२.२५ ऐकर जमिनिवर मागिल ३० ते ३५ वर्षापासून सध्यास्थितीत जवळपास ९०० हून अधिक परिवार राहात आहे.
मात्र वरील उल्लेखित संदर्भाने
शासन निर्णयानुसार मानीव भूसंपादनाची कारवाई मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडून करण्यात यावी तसेच सदर जमिनीवर नगर रचना विभाग, चंद्रपूर यांच्याकडून अभिन्यास तयार करून देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश होते तरीही मागील ३ वर्षांपासून सदर विषय रेंगाळत होता व म्हणून यासंदर्भात जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्या निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली सतत २ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व त्या बैठकीत या मोजणी च्या संबंधातील सर्व अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीतील चर्चेनुसार सदर जागेच्या मोजणी करिता लागणारे शुल्क भरण्या संबंधाने ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले व तसेच सदर जागेच्या एकूण मोजणीचा खर्च संबंधीत विभागातर्फे अंदाजे १२ लक्ष रूपये एवढा काढण्यात आला होता.
सदर मोजणीचा खर्च हा त्या जागेवर वास्तव्यास असणाऱ्या घरमालका तर्फे घेण्यात यावा व सर्व नागरिकांतर्फे एकूण १२ लाख रुपये गोळा करून भूमी अभिलेख कार्यालय चंद्रपूर येथे भरल्यानंतरच मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले होते.
परंतु वार्ड क्रमांक ३ येथे वास्तव्यास असलेल्या स्थानिक सर्वसामान्य कुटुंबातर्फे मोजणी करिता लागणारे शुल्क आकारू नये याकरिता मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी इतर विभागाकडून सदर जागेच्या मोजनीकरिता पैसे भरता येईल का याचे अवलोकन केले असता कोणत्याही विभागाने पैसे भरण्यास अनुकूलता दर्शविली नसल्याने हा प्रश्न पुन्हा मागील वर्ष भरापासून रेंगाळतच राहिला होता.
सदर बाब तत्कालीन मा. पालकमंत्री व मा. संपर्कमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशानुसार मा.जिल्हाधिकारी यांनी मोजणी संदर्भात असलेल्या नियमाला मोठया प्रमाणावर शिथिलता देण्यासंदर्भात मा. उप अधीक्षक भूमि अभिलेख, चंद्रपूर यांना निर्देश दिले होते व सदर जमिनीच्या मोजणी करिता लागणाऱ्या शुल्काची फक्त ५०% रक्कम घेऊन मोजणीची कार्यवाही सुरू करावी व "क" प्रत तयार करण्याची कार्यवाही करावी असे आदेश दिले होते व त्यासंदर्भात अधिकाऱ्यांचे एक संयुक्त पत्र काढण्यात आले होते. त्या अनुषंगाने दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ ला ग्रामपंचायत दुर्गापूरच्या माध्यमातून ही ५० टक्के रक्कम म्हणजेच जवळपास ६ लक्ष रुपये भरण्यात आले होते.
मात्र उर्वरित ५०% म्हणजेच ६ लक्ष रुपये हे जमिनीवर असलेल्या नागरीकांतर्फे घ्यावे लागत होते. सदर जागेवर वास्तव्यास असलेले कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने सदर शुल्कात सूट द्यावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकार व ग्रामपंचायत दुर्गापूर यांनी तत्कालीन पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.
त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत शासन स्तरावर यांदर्भात जिल्हा प्रशासनाने पत्र व्यवहार केल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मोजणी करीता सवलत देणेबाबत मा. जमाबंदि आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख म. रा. पुणे यांचे आदेश/परिपत्रकातील सूचनेनुसार विशेष बाब म्हणून मोजणी शुल्कात ५०% सूट देण्यात आल्याने तब्बल ६ लाख रुपये माफ झाले.
यामुळे या जागेच्या मोजणी शुल्का संदर्भात असलेले सर्व प्रश्न कायमस्वरूपी सुटले असुन सर्व सामान्यांवर येणारा आर्थिक भार देखील कमी झाला.
तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार, संपर्कमंत्री प्राजक्त तनपुरे, मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, मा. उप अधीक्षक भुमी अभिलेख यांचेसह या विषयासंदर्भात वारंवार शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करून संबंधीत सर्व अधिकार्यांची बैठक लागावी तसेच वार्ड क्रमांक ३ मधील राहिवासियांना मोजणीचे पैसे भरावे लागू नये व सदर प्रश्न तात्काळ कायमस्वरूपी मार्गी लागून या वार्डाचा विकास व्हावा याकरिता सतत पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, ग्रामपंचायत दुर्गापूर चे मा. सदस्य राजेंद्र मेश्राम, ग्रामपंचायत दुर्गापूर सरपंच मा. सौ. पुजाताई मानकर, उपसरपंच मा. प्रज्योत पुणेकर, माजी सरपंच मा. अमोल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते मा. सचिन मांदाडे, शिवसेना युवा नेते मा. शार्दुल गणवीर यांचे गाववासीयांनी आभार मानले.
दिनचर्या न्युज