जागतिक योग दिनी इको-प्रो व भारतीय पुरातत्व विभाग चा संयुक्त उपक्रम





जागतिक योग दिनी इको-प्रो व भारतीय पुरातत्व विभाग चा संयुक्त उपक्रम

*नियमित योग करीत आरोग्य जपण्याचा तर ऐतिहासिक स्मारक, किल्लावरुन ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा संदेश*

*आरोग्यासाठी योगा, व्यायाम करिता किल्ला परकोटाचा वापर करीत वारसा संवर्धन करण्याचे आवाहन*


दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर : आज जागतिक योग दिनाचे दिवशी गोंडराजे यांचे समाधिस्थळ चंद्रपुर किल्ला परकोट वरुन योग दिन साजरा करित, आपले आरोग्य व शहरातील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याच्या संदेश भारतीय पुरातत्व विभाग व इको-प्रो संस्थेच्या वतीने देण्यात आला.

अंचलेश्वर मंदिर लगत असलेल्या ऐतिहासिक वास्तु असलेले गोंडराजे यांचे समाधिस्थळ व शहरातील किल्ला परकोटाच्या भिंति, बुरुजावरुन योग करीत आरोग्यासाठी योग, प्राणायाम व व्यायामाचे महत्व तर शहरातील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन कार्यात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग मिळावा म्हणून दरवर्षी जागतिक योग दीनी सदर उपक्रमाचे आयोजन केले जाते.

चंद्रपुर शहरातील 11 किमी लांब, 550 वर्ष प्राचीन गोंड़कालीन किल्ला परकोटची स्वच्छता अभियान सलग एक हजार अधिक दिवस निरंतर चालवित स्वच्छता केली. यानंतर याच किल्लावरुन पर्यटन करिता हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. सोबत या किल्ल्याचे संरक्षण व्हावे, स्वच्छता कायम राहावी म्हणून वेगवेगळ्या उपक्रम सोबतच "योग दिनाचे" आयोजन केले जाते.



चंद्रपुर किल्ला परकोटाला जवळपास 39 बुरुज 4 मुख्य गेट आणि 5 खिड़की आहेत या ठिकाणी किल्लावर योगा, व्यायाम करण्यास उत्तम जागा आहे. ही ठिकाणे शहराच्या सभोवताल आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक नागरिक, युवक किंवा योग समितीनी नियमित वापर केल्यास कायम स्वच्छता राहिल, असामाजिक तत्वाचा वावर राहणार नाही. आणि आपल्या शहरातील ऐतिहासिक् वारसा संरक्षण, संवर्धन करण्यास लोकसहभाग सुद्धा मिळविणे सहज शक्य होईल. म्हणून इको-प्रो तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

आज पहाटे गोंडराजे समाधिस्थळ, रामाळा तलाव लगत बगड़ खिड़की, बुरुज 4, बुरुज 5 व किल्लाच्या भिंतिवरुन, इको-प्रो कार्यकर्ते यांनी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरातत्व विभागाचे शाहिद अख्तर यांचे नेतृत्वात योग दिनाचे कार्यक्रम घेतला, यावेळेस संस्थेचे नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, अनिल अडगुरवार, विनोद दुधनकर, ओमजी वर्मा, सुनील पाटिल, सुनील मिलाल, मनीष गावंडे, राजू काहीलकर, सुधीर देव, राजेश व्यास, कपिल चौधरी, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, चित्राक्ष धोतरे, रुद्राक्ष धोतरे तसेच पुरातत्व विभाग चे बंडू पिसे, मधुकर पडाल, विकासकुमार, प्रवीण उन्दिरवाडे आदि सहभागी झाले होते.

दिनचर्या न्युज :-