चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्डात युवकाचा धारदार शस्त्राने खून!





चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्डात युवकाचा धारदार शस्त्राने खून!

एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोडवर असलेल्या अष्टभुजा वार्डात एका 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज 25 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली.नेमकी हत्या कशासाठी झाली याचा शोध पोलीस घेत आहेत.
हत्येची घटना उघडकीस होताच चंद्रपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अष्ठभुजा वार्डात 20 वर्षीय धर्मवीर उर्फ डबल्या अशोक यादव या युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही हत्या नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली हे उघडकीस आली नाही.

या प्रकरणी माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल करू दाखल होऊन पंचनामा केला. श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.