ओ बी सी आरक्षण विरोधी केंद्र सरकार च्या विरोधात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन




ओ बी सी आरक्षण विरोधी केंद्र सरकार च्या विरोधात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
गेल्या अनेक दिवसा पासून केंद्र सरकार ओ बी सी समाजावर अन्याय करत आहे. तसेच ओ बी सी ची जनगणना न केल्या मुळे ओ बी सी समाजावर केंद्र सरकार अन्याय करीत आहे.
तसेच सुप्रीम कोर्टात इंपेरिकल डेटा न दिल्या मुळे महाराष्ट्रात ओबीसी चे आरक्षण धोक्यात आले आहे.
ह्याच विषयाला घेउन आज दिनांक 20/5/22 ला चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळ्या जवळ चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार चा निषेध करण्या करिता धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व प्रथम धरणे आंदोलनची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज, तसेच भारतीय संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या फोटोना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धरणे आंदोलन दरम्यान केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
तसेच ओबीसीच्या विषयावर उपस्थित मान्यवरांनी आप आपले विचार व्यक्त केले,त्या मध्ये जेष्ठ नेत्यांनी आपले विचार मांडले त्या नंतर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी आपले विचार मांडतांना केंद्र सरकारने ओ बी सी समाजाचे कसे नुकसान केले ह्याचे पुरावे सादर करण्यात आले.
धरणे आंदोलन दरम्यान जेष्ठ नेते बोरकुटे साहेब,बाबासाहेब वासाडे, महिला विभागीय अध्यक्ष शाहीन हकिम, ,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, ओ बी सी जिल्हाध्यक्ष डी के आरिकर, महिला अध्यक्ष शालिनी महाकुलकर, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे,महिला विधानसभा अध्यक्ष अंजली परकरवार,महासाचीव संभाजी खेवले, अल्पसंख्याक अध्यक्ष नौशाद सिद्दिकी,उपाध्यक्ष कुमार पॉल,निसार शेख,विनोद लभाने,राहुल देवतळे,ओबीसी शहर अध्यक्ष विपीन झाडे,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष बंदुजी दाखरे, ,जिल्हा उपाध्यक्ष सुर्या अडबाले,कंनाके साहेब उद्योग व्यापार अध्यक्ष प्रवीण जुमडे,युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, माधुरी येरणे,विद्यार्थी अध्यक्ष कोमिल मडावी,मुन्ना तेमबुरकर,माया पटले,जोगी,माजी नगरसेवक राजेंद्र आखरे,महासचिव धनंजय दानव,शंकर सरदार,अमित गावंडे,भरती बोबडे,शिल्पा कांबळे,मिनू जमगाडे,गोविंदा ठेंगणे, तसेच असंख्य महिला युवक व कार्यकरते उपस्थित होते.