राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा मनपावर पाण्यासाठी निषेध!
दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भटारकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांच्या मार्गदर्शनाने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सतीश मांडवकर व राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष राहुल देवतळ यांच्या नेतृत्वात आज महानगर पालिका समोर निषेध करण्यात आले.
गेल्या सहा दिवसापासून शहरात पाणी येत नाही,पिण्याच्या पाण्याची समस्या शहरात वाढत चाली आहे. शहरात वाढते तापमान अस्यातच पाण्याची समस्या याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांना पाणी मिळावे म्हणून शहरातील गोर गरीबासाठी राष्ट्रवादीचे मावळे धावले.
आज दि.28 मार्च ला स्थानिक मनपा जवळ जोरदार निःशेष नोंदविण्यात आला.
आणि सत्ताधाऱ्यांना चेतावणी देण्यात आली की जर दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर मोठं आंदोलन मनपा समोर करण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शरद पवार विचार मंचचे अध्यक्ष निमेशजी मानकर अक्षय सगदेव,शहर महासचिव संभाजी खेवले,युवक प्रवक्ते प्रलय मशाखेतरी,कुमार पाल व सदस्य उपस्थित होते......