गडपिपरी येथे रासेयो शिबिरातून गावाला पुनर्जीवित करण्याचे काम !




गडपिपरी येथे रासेयो शिबिरातून गावाला पुनर्जीवित करण्याचे काम !

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
राष्ट्रपिता म. गांधीजींनी भारताचे जे स्वप्न पाहिले होते, त्यामध्ये केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर त्यात एका स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती. त्याचे स्वप्न पुर्णत्वाकडे नेण्यासाठी भारत सरकारने त्यांच्या जन्म शताब्दी वर्षापासुन राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केली. कोरोना महामारीचे देशावर आलेले अनेक संकट, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कोरोना महामारीचे देशावर आलेले अनेक संकट, या अनुषंधाने कला व वाणिज्य महाविद्यालय, भिसी येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्राम पंचायत गडपिपरी यांचे सहकार्यने 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ग्रामिण विकासाकरीता युवक' या विषयावर विशेष शिबीराचे आयोजन केलले आहे.
सात दिवसात चालणाऱ्या शिबिरातून अनेक उपक्रम राबविला जात आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे पुरातन विभागातील हेमाडपंती विहिरीचे साफसफाई करून पुनर्जीवित करून गावातील पुन्हा आठवणी जागृत करून दिल्या . या विहिरीला गाव परिसरातील लोक देव विहीर या नावाने ओळखात.



गडपिपरी येथे कला व वाणिज्य महाविद्यालय भिसीच्या रासेयो विभागाद्वारा २2 मार्च ते28 मार्च पर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले . यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे (रेडेकर), चिमूर समाजोन्नती ब. संस्थेचे संचालक सुनील जावडेकर, प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर, प्राचार्य डॉ. राजेंद्र जाने, माजी पं. स. सदस्य प्रदीप कामडी, साहित्यिक व पत्रकार प्रा. आनंद भिमटे, गडपिपरी ग्रा.पं. सरपंच जयमाला बोरकर, उपसरपंच कल्पना हरडे, ग्रा. पं. सदस्य सुधाकर वाकडे, योगेश करारे, मंगला एकवनकर, चंदूलाल पाटील, सरिता शामकुळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र जाने, संचालन रासेयो विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनकर चौधरी व आभार प्रा. डॉ. ईश्वर रंदये यांनी मानले.