पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांची नितीन भटारकर यांच्या उपोषण मंडपाला भेट






पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांची नितीन भटारकर यांच्या उपोषण मंडपाला भेट.

वनविभागाला वाघ व बिबट तात्काळ जेरबंद करण्याचे दिले निर्देश.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- दुर्गापुर, ऊर्जानगर व लगतच्या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून वाघ, बिबट्या व अस्वल यांचा मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला होता.
मागील काही महिन्यात झालेल्या या प्राण्याच्या हल्ल्यात या परिसरातील जवळपास ७ ते ८ सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
म्हणून या हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्यात यावे याकरिता वन विभाग चंद्रपूर यांच्याकडे वारंवार प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती, परंतु वनविभागातर्फे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.

दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२२ या सलग दोन दिवशी या परिसरातील २ नागरिकांचा या प्राण्याच्या हल्ल्यात जीव गेला व म्हणून वन विभागाच्या ढिसाळ, नियोजनशुन्य कारभाराच्या निषेधार्थ नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ अन्यत्याग आंदोलनाला सुरुवात केली.

सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार साहेब यांनी आज उपोषण मंडपाला भेट देऊन शासन स्तरावरील ज्या परवानग्या लागेल उपायोजना असेल त्या तात्काळ राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून यापुढे वन विभागाची हय गय खपवून घेतली जाणार नाही असे सांगितले. तसेच उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून मी सतत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.




व या गंभीर विषयासंदर्भात आज हिराई गेस्ट हाउस येथे मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक, मा. मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, मा. मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर या सर्वांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी मा. पालकमंत्री महोदयांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश भाऊ देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. संदीप भाऊ गड्डमवार, इंटक कामगार संघटनेचे नेते मा शंकरजी खत्री हे उपस्थित होते