जुनोना तलावाला इकॉर्निया वनस्पतीपासून मुक्त करून कालव्यांची दुरूस्ती करा – आ. मुनगंटीवार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हयातील ऐतिहासिक जुनोना तलावात इकॉर्निया वनस्पती मोठया प्रमाणात निर्माण झालेली आहे. या वनस्पतीला तलावातुन काढून तलाव ताबडतोब स्वच्छ करावा असे निर्देश पाटबंधारे विभागातील अधिका-यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
जुनोना तलाव हा ऐतिहासिक महत्व असलेला तलाव आहे. या तलावावर वन्यप्राणी, पक्षी तसेच अनेक जलचर प्राण्यांची उपजिवीका अवलंबून आहे. तसेच चंद्रपूर शहरालगत असल्यामुळे हा तलाव चंद्रपूरकरांकरीता पर्यटनाचे ठिकाण आहे. तसेच जुनोना या गावातील शेतीव्यवसाय हा सुध्दा याच पाण्यावर संपूर्णतः अवलंबून आहे. या तलावाचे कालवे ५० ते ६० वर्षे जुने असल्याने ते अनेक ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात शेतक-यांना पाण्याची गरज असताना मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे येथील शेतक-यांनी आ. मुनगंटीवार यांना इकॉर्निया वनस्पती काढणे व कालव्यांची दुरूस्ती करणे यासंदर्भात निवेदन दिले. त्याची लगेच दखल घेत आ. मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक, संबंधित ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी २९ डिसेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष जुनोना तलावाची पाहणी केली. त्यानुसार लवकरात लवकर तलाव स्वच्छतेचे व कालवा दुरूस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी पाटबंधारे विभागातील अधिका-यांना दिले.
निवेदन देणा-यांमध्ये रमणीकलाल चव्हाण, जि.प. सदस्य गौतम निमगडे, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत धोडरे, जुनोना येथील अमोल जगताप, नथ्थुजी कौरासे, मनोज कोटरंगे, विनायक प्रधान, श्रीहरी कार्लेकर, मेघश्याम पेटकुले, सौ. चंदा देवगडे यांचा समावेश आहे.
दिनचर्या न्युज