दिनचर्या न्युज :-
भद्रावती प्रतिनिधी :-भद्रावती चे तहसीलदार डॉ. नीलेश खटके हे अगोदरच विवादात असल्यासारखे वागत होते व प्रत्त्येक रेती वाहतूक करणाऱ्याकडून हप्ता वसुली करीत होते अशातच एका व्यक्तीच्या रेतीचा साठा साठविन्यासाठी परवानगी देण्याच्या नावाखाली तहसीलदार खटके पैशाची मागणी करीत होते, त्यामुळे संबंधित व्यक्तीने तहसीलदार यांची मस्ती जिरवायचा निर्णय घेऊन नागपूर येथील लाचलुचपत विभागाला याबद्दल तक्रार देऊन माहिती दिली आणि ठरल्याप्रमाणे तब्बल 25 हजाराची लाच घेताना भद्रावती येथे तहसीलदार अटक करण्यात आली या घटनेने महसूल प्रशासनामधे एकच खळबळ उडाली आहे.
ब्रम्हपुरी येथे नायब तहसीलदार असताना डॉ. नीलेश खटके यांनी अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांकडून पैसे घेऊन त्या विरोधात तक्रारी करणाऱ्या मनसे तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशन मधे खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तत्कालीन ठाणेदार यांनी अशा खोट्या तक्रारी मी घेत नाही सबळ पुरावे आणा असे म्हणून तहसीलदार खटके यांना हुसकावून लावले होते. यानंतर पोम्भूर्ना येथे तहसीलदार असताना सुद्धा अनेक सातबारा फेरफार व इतर प्रकरणात शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या डॉ नीलेश खटके यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी गोंडपिंपरी यांच्याकडे तक्रारी आहेत आणि आता ते एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने आता त्या प्रकरणात सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.