त्या जुन्या दारूच्या बाटल्या जैविक पाणी तपासणीसाठी, ग्रामपंचायतला बदनाम करण्यासाठी केलेले कटकारस्थान- सरपंच नीरज कुमार उर्फ नागेश बोंडे chandrapur

.




.. त्या जुन्या दारूच्या बाटल्या जैविक पाणी तपासणीसाठी, ग्रामपंचायतला बदनाम करण्यासाठी केलेले कटकारस्थान- सरपंच नीरज कुमार उर्फ नागेश बोंडे
 
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
  ग्रामपंचायत सखारवाही येथे दिनांक 25/ 11/ 2021 ला  ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ती समाप्त झाल्या नंतर ग्रामपंचायत सदस्य  विनोद खापणे व नामदेव डाहुले यांनी 
गट विकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांना बोलावून खोटी माहिती दिली असता. ते ग्रामपंचायतला आले. आणि ज्या रूममध्ये जैविक पाणी तपासणीसाठी खाली लेबल लावलेल्या दारूच्या जुन्या बाटल्या आढळल्या. मात्र 
ग्रामपंचायतला बदनाम कर करण्याचे कटकारस्थान रचले गेले आहे असा आरोप सरपंच नीरज कुमार बोंडे यांनी केला आहे. पंचायत मध्ये ठेवलेल्या त्या रिकाम्या दारूच्या बाटल्या जैविक पाणी तपासणी साठी वापरण्यासाठी ठेवल्या जात आहेत. या बाटल्यांची चौकशी  विस्तार अधिकारी चंद्रपूर त्यांच्या  सोबत  सभापती, उपसभापती त्यांच्या समक्ष करण्यात आली आहे .आम्हीच नाही तर  ईतर ग्रामपंचायत मध्ये खाली दारूच्या बाटल्या 180 एम एल च्या ह्या जैविक पाणी तपासणी साठी वापरण्या करीता आल्या होत्या. मात्र राजकीयदृष्ट्या कुठल्यातरी हेतू पुरस्पर ग्रामपंचायतसह सरपंचाला वगांवाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. कुठलीही ग्रामपंचायत असे कृत्य करू  शकत नाही. हे सरळ सरळ असताना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठीच अशा प्रकारचा वापर करण्यात आला असा  आरोपही सरपंचांनी केला. गावाची प्रतिष्ठा आणि गरिमा राखण्याचे काम सदैव सरपंच  या नात्याने मी करीत असते गावाचे चांगले होण्याचा प्रयत्न सदैव आमच्याकडून होत असताना विरोधकांना पोटात दुखत असल्याने हे असे प्रकार सुचत असतात. या संदर्भातील चौकशी होऊन संबंधितांवर  ग्रामपंचायतला ,आम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले आहे .आम्ही   वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यासाठी तशी तक्रारीही करणार आहेत. 
संबंधित वर्तमानपत्राला बातमी हे चुकीचे असून दिशाभूल करणारी आहे. कुठल्याही प्रकारची  ग्रामपंचायत  मध्ये दारूच्या  बाटल्या पिण्यात आलेल्या नसून .त्या जैविक पाणी तपासणी  करिता आणण्यात आल्या होत्या असे गट विकास अधिकार्‍यांसमोर ग्रामपंचायत  सरपंच,उपसरपंच, सचिव, व कर्मचारयांनी लेखी बयान दिले. असल्याचे त्यांनी सांगितले. 

     

.