मामला फाटा ते मामला पर्यंत वनविभागाने लावलेल्या स्पीड ब्रेकर मुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ !जिवित हानी झाल्यास जबाबदारकोण?







मामला फाटा ते मामला पर्यंत वनविभागाने लावलेल्या स्पीड ब्रेकर मुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ !जिवित हानी झाल्यास जबाबदारकोण?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
जिल्ह्यातील अनेक गावे हे वन विभागाचा क्षेत्रात असून या गावातील अनेक लोकांना चंद्रपूर शहरात कामानिमित्त ये जा करावी लागते. मात्र वन विभागाच्या अड्डेल तट्टू धोरणाराने अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. वन विभाग मोठा अपघात होण्याची वाट तर पहात नसेल ना ? प्रश्न निर्माण होत आहे.
वन प्राण्याचे संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाने वन विभागाने स्पीड ब्रेकर लावले आहे.वनप्राण्याचे संरक्षन तर दुरच पण मानसानाच आपले जिव गमवावे लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे स्पीडब्रेकर तयार केले आहे.
मामला फाटा ते मामला पर्यंत जवळपास 14 ब्रेकर्स तयार केले असून यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कालच शुभम संजय हजारे वय तीस वर्ष, हा इंदिरानगर चंद्रपूर येथील रहिवासी होता. फर्निचरचे काम कारणासाठी गेलेल्या सोबत्याला वापस घेवूयेत    असताना मामला बस  स्टाप जवळ वन विभागाने लावलेल्या स्पीड  ब्रेकवर अपघात झाला.  
तर  किरण घनश्याम जेंगठे वय 35 ही मामला फाटा पासून लिफ्ट घेऊन घरी येत असताना ब्रेकर मुळे पळली त्यात तिचा हात मोडला व त्या गरीब महिलेला बिन फालतू घरी बसावे लागले.
असे किती तरी घटना मामला फाटा ते मामला गावप्रयन्त घडलेल्या आहे.तर कु आरुष संतोष करपते वय 10 रा,वायगाव विजेच्या शॉक लागलेला होता. त्याला दवाखान्यात नेत असतांना वन विभागाने लावलेले स्पीड ब्रेकर मुळे त्याला दवाखान्यात न्यायला उशीर झाला. व दवाखान्या प्रयन्त जायच्या आधीच त्या मुलाचा जीव गेला याला जबाबदार कोण?



 या.  सर्व प्रकाराला वन विभाग जबाबदार असून वन विभाग  लावलेले ब्रेकर  तुरंत  हटवावे .या रस्त्यावरून  मामला ,वायगाव, लिंबाळा, चेक निंबाळा, दुधाळा, या गावातील लोक  येणे  जाणे करतात .    स्पीड ब्रेकर  हटविले  नाहीतर, स्वतः गावातील लोक  स्पीड ब्रेकर तोडून टाकतील, म्हणून वन विभागाने  लावलेले स्पीड ब्रिकर हटविण्यात यावे. अन्यथा वन  विभागाच्या विरोधात  तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार  असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहेत.
 या झालेल्या अपघातात संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दूरध्वनी द्वारे  विचारणा केली असतात. त्यानी फोन उचलण्यास असमर्थता दाखवली.