चंद्रपूरच्या पुर्वा खेरकर व संगीता बांबोडे राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित chandrapur





चंद्रपूरच्या पुर्वा खेरकर व संगीता बांबोडे राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित


दिनचर्या न्युज :-
राजूरा (चंद्रपूर)- राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्य क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक तर्फे आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 चे आयोजन महेश भवन नाशिक येथे दिनांक 29 ऑगस्ट 2021 ला करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्याती प्राप्त खेळाडू व अथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल खेळाची प्रशिक्षिका कुमारी पूर्वा गणेशराव खेरकर हिला शालेय व संघटना विभागात उत्कृष्ठ कार्याबद्दल तसेच विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चा क्रीडा संचालिका, जिल्हा फेन्सिंग, बॉक्सिंग खेळाचा संघटक प्रा. संगीता बांबोडे हिला विद्यापीठ व संघटना विभागात उल्लेखनीय कार्याबाबत यांचा माजी ओलंपियन व भारतीय ऑलिम्पिक संघाचे सदस्य श्री मालव श्रॉफ यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 प्रदान करून सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोक दुधारे निरीक्षक टोकिओ ओलंपिक 2021, जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक श्री नाईक यांची उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्याचा या दोन्ही महिला क्रीडा रत्नांनी क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रात मनाचा तुरा रोवला असून त्यांचा यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पुर्वा व संगीता यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय आई वडील, भाऊ व खेळाडू तसेच गुरुजनांना दिलेले आहे.

दिनचर्या न्युज