मनपात सभापती म्हणुन पक्षालाच का 'बोचतो' वसंत देशमुख!
भाजपला का चालू शकत नसेल सभापती म्हणून वसंत देशमुख
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
वसंत देशमुख हे चंद्रपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राहिलेले राजेश्वर सोमाजी देशमुख यांचे सुपुत्र आहे. राजेश्वर देशमुख हे कट्टर काँग्रेसी होते. पण वसंत देशमुख यांच्या शरीरात राजकीय रक्त सळसळत असल्याने त्यांनी विपरीत विचारधारेने भवानी सेनेला चंद्रपुरात रुजविले .हे बघून त्यांच्यावर भाजपने आपल्या नजरा ताणून धरल्या होत्या. कारण त्यावेळी भाजप हळूहळू पाय पसारू पाहत होती. अशात भवानी सेनेचे आक्रमक कार्यकर्ते ज्या पद्धतीने डोके वर काढत होते ते भाजपसाठी बहुमूल्य होते. कालांतराने भवानी सेनेचे विसर्जन होऊन भवानी सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये सामिल झाले. त्यानंतर भाजपला जी बळकटी मिळाली तेव्हापासून तर आजतागायत येनेकेने प्रकारे भाजप जिल्हा परिषद महानगरपालिका ,नगरपालिका व पंचायत समिती,ग्रामपंचायती मध्ये आपले रितसर पाय रोवण्यात सबळ ठरत गेली. म्हणून एक हाती सत्ता सांभाळणाऱ्या काँग्रेसला भाजपा सारखा मजबुत विरोधकही मिळाला व परिणामी काँग्रेसच्या तुलनेने भाजप सरसावली सुद्धा.
वसंत देशमुख हे नाव आज चंद्रपूर महानगर पालिकेसाठी नवीन नाही. कारण गेल्या 30 वर्षाचा त्यांचा पालिकेचा अभ्यास व जनतेसोबत थेट संबंध म्हणजे ते एकंदरित जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यांचा मूळचा स्वभाव म्हणजे अभ्यासू व आक्रमक असल्याने अधिकारी सुध्दा त्यांना सन्मान देतात. मदतनीस व 24 तास जनतेच्या सेवेत असलेले वसंत देशमुख हे त्यांच्या प्रभागातच नाही तर सर्व प्रभागात कार्य करतात, समाज व्रत पाडतात शिवाय मदतीला धाऊन जातात असे म्हणून ओळखले जाते.
त्यांची ही ओळखच विद्यमान पदाधिकारी लोकांना नापांसतीची असावी म्हणून त्यांना सभापती पदापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र विद्यमान भाजपाच्या सत्ता पदाधिकारी लोकांना असावी. दुसरं कारण असं की, भाजपचे गटनेते म्हणून त्यांनी विपरीत विचारधारेच्या पक्षाला सोबत घेऊन महानगरपालिकेत भाजपची सत्ता आणली शिवाय बाबुपेठ जिथे बसपाचा बालेकिल्ला असताना तिथे नगरसेवक निवडून आणून जी जादुगिरी केली, ती विद्यमान पदाधिकारी लोकांना चांगलेच माहिती आहे. म्हणून जर वसंत देशमुख हे जे मागच्या सभापती पदाच्या निवडणुकी वरून झालेल्या गद्दारी मुळे नाराज चालले आहे ते सभापती बनले तर ह्यांच्या मनमानी कारभाराला कूठे खिंडार तर लागणार नाही ना? असा धोका कदाचित विद्यमान भाजप पदाधिकारी लोकांना असावा.
म्हणून विद्यमान परिस्थितीत भाजप पक्ष श्रेष्ठी कडून वसंत देशमुख यांना पहिली पसंती असताना हेतुपुरस्सर त्यांच्यावर त्याच मनमानी पदाधिकारी लोकांना स्थायी समिती सदस्य यादीत स्थान मिळावे अशी रणनीती आखल्या जात आहे. जेणेकरून मागील वेळेसारखा त्यांना दगा फटका द्यायला मार्ग मोकळा होईल. म्हणून सावध पवित्रा घेतलेल्या वसंत देशमुख यांनी भाजप तर्फे नव्याने स्थायी समिती सदस्य म्हणून तीन नावे कोणती असे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष यांना दिले नसल्यानें त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
आता विषय असा येतो की, नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत विद्यमान सभापतीसह ज्यांचा कार्यकाळ संपला त्यांना अधिकृत रित्या बाद ठरविण्यात आले आहे. मग अशा परिस्थितीत येणाऱ्या आमसभेत स्थायी समितीच्या सभापतीच्या पदाचा तिढा सुटणे ही गरजेचे असताना विद्यमान महापौर आमसभा होऊ देईल काय? जे की नियमाने घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास महानगर पालिका आयुक्त कुठली भूमिका घेतात व विद्यमान पदाधिकाऱ्यांची पाठराखण करून नियमाचे सर्रास उल्लंघन होऊ देतात हे बघण्यासारखे आहे!
पण काही जरी असेल तरी वसंत देशमुख हे नाव विद्यमान पदाधिकारी लोकांना अत्यंत जड होणार असल्याची भिती तर नाही ना? असे वाटत असल्याने कुरघोडीचे डावपेच बघायला पक्षांतर्गतच गटबाजी ही बोचणारी आहे!