*"सर्जनशील अभिव्यक्तीची बंडखोर कविता*"
प्रभू राजगडकर
*आपण कोणत्या देशात राहतो...!*
काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
दिनांक २८फेब्रुवारी२०२१ रोजी उलगुलान साहित्य मंच द्वारा आयोजित प्रब्रह्मनंद मडावी रचित "आपण कोणत्या देशात राहतो...!" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर येथे संपन्न झाला प्रकाशनाच्या दुसऱ्या सत्रात नवोदित कवीसाठी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेे. कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याकरीता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि जेष्ठ कवी तथा साहित्यिक प्रभू राजगडकर , प्रकाशक म्हणून डॉ.नीलकांत कुलसंगे (कवी तथा नाट्यलेखक माजी डायरेक्टर नँशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली) , प्रमुख पाहूणे मा.धर्मराव पेन्दाम (जिल्हा कोषागार अधिकारी) , कुसुमताई आलाम (जेष्ठ कवीयत्री ), प्रा.डॉ.विद्याधर बन्सोड (कवी , लेखक , साहित्यिक ),डॉ .प्रविण येरमे व डॉ.शारदा येरमे हे उपस्थित होते .
या प्रसंगी कविता संग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ तयार केलेले चित्रकार मा.भारत सलाम यांचा अतिथीच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.भोलाजी मडावी
सूत्रसंचालन प्रा.रेवनदास शेडमाके , तर आभार प्रदर्शन मा.भैय्याजी ऊईके यांनी केले .
या काव्यसम्मेलनाचे सम्मेलनाध्यक्ष मा.राजेश राजगडकर उपमुख्य अभियंता (चंमहाऔविकेंद्र) हे होते.
कवीसंमेलनासाठी विविध जिल्हयातील नवोदित कवींनी कविता सादर करण्याकरीता सहभाग नोंदविला त्यात प्रामुख्याने निमंत्रित कविसंमेलन सहभागी कवी मध्ये
संतोषकुमार उईके, गोंडपिपरी, मालतीताई सेमले,गडचिरोली,
नरेंद्र कन्नाके,आनंदवन ,
रत्नमाला मोकाशी /धुर्वे,चंद्रपूर,
धर्मेंद्र कन्नाके ,ऊर्जानगर,
प्रविण आडेकर,भद्रावती,
सुधाकर कन्नाके,बल्लारपूर ,
व (सूत्रसंचालन )नरेशकुमार बोरीकर ,चंद्रपूर यांनी सहभाग नोंदविला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उलगुलान साहित्य मंचाच्या वतीने भोला मडावी ,भैय्याजी उईके , कृष्णा मसराम ,कल्पना मडावी , तेजस मडावी, सुनील सुरपाम , किशोर पेन्दे तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी सक्रिय सहभाग नोंदविला .
दिनचर्या न्युज