निमंत्रित कविसंमेलनात प्रख्यात कवी राजेश बारसागडे यांचा प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मान
लोकयात्रा बहुउद्देशीय संस्था खुटाळा,चंद्रपूर यांचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
नागभीड :-
चंद्रपूर येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात लोकयात्रा बहुउद्देशीय संस्था खुटाळा,चंद्रपूर तर्फे आयोजित केलेल्या प्रसिद्ध कवी प्रमोदकुमार अनेराव यांच्या "काही सांगता येत नाही" या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त दुसऱ्या सत्रात आयोजित कविसंमेलनात कवी राजेश बारसागडे यांना काव्यवाचनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.आणि त्यांचा प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.
चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात लोकयात्रा फाउंडेशन खुटाळा,चंद्रपूर तथा डॉ.जया द्वादशीवार ग्रंथालय खुटाळा,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथील प्रसिद्ध कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या लोकवांड.मय प्रकाशनगृह,मुंबई प्रकाशित "काही सांगताच येत नाही" या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनात नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील "कोंबडा झाला घड्याळ"कार तथा महाराष्ट्र राज्य पुरस्कृत कवी, पत्रकार राजेश देवराव बारसागडे या प्रसिद्ध कवीचा समावेश होता. त्यांनी 'दुःखांचे वळ' हि कविता सादर केली. या कवितेत त्यांनी दोन प्रेमींच्या विरहाची व्यथा मांडली आहे. या कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीपाद प्रभाकर जोशी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य ना गो. थुटे,प्रमोदकुमार अणेराव यांची उपस्थिती होती.या कविसंमेलनाचे सुंदर असे संचालन ऍडोकेट दीपक चटप यांनी केले. या कविसंमेलनात 16 नामवंत कवींचा निमंत्रित कवी म्हणून समावेश करण्यात आला होता. याप्रसंगी कवी राजेश बारसागडे यांचा प्रख्यात कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.