निष्ठावान कार्यकर्ताच्या पाठीत भाजपाने खुपसला खंजीर, पुन्हा ओबीसी तेली समाजावर अन्याय!
चंद्रपूर - दिनचर्या न्युज
महानगरपालिका चंद्रपूरची स्थाई समिती तथा झोन सभापती पदाकरीता पक्षाने तथा पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेऊन कुठल्याही राजकीय खेडी न करता अगदी शांत पणे पक्ष तथा पक्ष श्रेष्ठीवर विश्वास ठेऊन गाफील राहिल्याचा दगा फटका देवून गनीमिकावा खेळून
पाठीत खंजीर खुपसल्याचे शल्य एका निष्ठावान कार्यकर्ताच्या माती आले.
निष्ठावान कार्यकर्ताच्या पाठीत भाजपाने पुन्हा एकदा खुपसला खंजीर, दावेदारीत असलेल्या ओबीसी तेली समाजावर अन्याय!
हा अन्याय ओबीसी तेली समाजाला भोगावा लागला हे मात्र खरे .
सविस्तर वृत्त असे आहे की , भाजप नावाची ओळख नसतानाही स्वतःच्या खांद्यावर भाजपचा डोलारा घेऊन गेल्या पंचेविस वर्षापासून वसंत राजेश्वरराव देशमुख हे भिवापूर मध्ये कमळ फुलवीत आले .ते सध्या विद्यमान म्हणून भाजप पक्षाचे सभागृह नेता तथा गटनेता होते परंतु सध्या होत असलेल्या स्थाई समिती अध्यक्ष पदाकरीता म्हणून जिल्ह्याच्या पक्ष श्रेष्ठी म्हणून जे सुत्र हलवीतात असे माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वसंत देशमुख यांचेकडून सभागृह नेता ह्या पदाचा राजीनामा द्यायला लावला .याचा अर्थ स्पष्ट होता की , पक्ष श्रेष्ठी जेव्हा स्थाई समिती पदाकरिता सभागृह नेता ह्या पदाचा राजीनामा द्यायला लावतात .याचा अर्थी स्पष्ट होता की ,माजी नगराध्यक्ष असलेल्या राजेश्वररावजी देशमुख यांचे सुपुत्र असलेले वसंत देशमुख हे 100% स्थाई समिती अध्यक्ष बनणार .मग असं असताना असं काय झालं म्हणून ऐन वेळी स्थाई समिती अध्यक्ष पद हे अल्प संख्यक असलेल्या व्यक्तीला बहाल झाले .याचा अर्थ स्पष्ट आहे की , ही पूर्वनियोजित संकल्पना होती .
ही संकल्पना स्पष्ट यासाठी होते की , झोन क्र.2 साठी दावेदार असलेल्या छबुताई वैरागडे ह्या तिथून प्रबळ दावेदार असताना त्यांना डावलून राहुल घोटेकर ह्या शर्यतीत नसलेल्या उमेदवाराला झोन सभापती पद बहाल होते .तसेच झोन क्र.3 च्या पदासाठी नगरसेवक प्रदीप किरमे जवळपास सर्व स्तरावरुन झोन सभापती म्हणून निश्चित होते .
मग असं काय झालं की तिन्ही दावेदार नगरसेवकांना डावलून दुसऱ्या व्यक्तींना पद बहाल झाले .
पण पक्षाची रणनीती तेली समाजाला डावलून निर्णय घेण्याची बघून प्रचंड आश्चर्य वाटते .हेतुपुरस्सर वसंत देशमुख यांचा नाथा भाऊ केल्याची बातमी नगरसेवकात जशी पसरली त्यामुळे सर्व पक्षाचे दिग्गज लोकं वसंत देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचेही चित्र निर्माण झालेले दिसते .कारण वसंत देशमुख हे एक असे नगरसेवक आहे ज्यांनी स्वबळावर चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप सत्तेत असावी करिता विरोधी पक्षालाही सोबत घेऊन सत्ता शाबूत ठेवली .आणी त्यामुळे तेली समाज ही भाजपला घेऊन आजपर्यंत चालत होता .पण वसंत देशमुख यांच्या सोबत प्रदीप किरमे आणी छबुताई वैरागडे यांच्यावर ही केलेल्या अन्यायावर निश्चित विचारमंथन होईल .हे निश्चित .
ह्या बाबतीत वसंत देशमुख यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली असता त्यांची संपूर्ण मानसिकता ही प्रचंड उग्र स्वरूपाची दिसली .तथा उद्या निवडणूकी दरम्यान काही तरी उचलबांगडी होईल हे स्पष्ट केले .वेळ प्रसंगी पक्षाचा राजीनामा ही देईल की काही नगरसेवक घेऊन पक्षाबाहेरची वाट घेतल्या जाईल हे अजून ही गुलदस्त्यात आहे .