आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयावर समाजवादी पार्टीचा मोर्चा! Chandrapur




आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयावर समाजवादी पार्टीचा मोर्चा!

निवडणुकीत 200 युनिट माफ करण्याचे दिले होते आश्वासन?
चंद्रपूर
दिनचर्या न्युज :
 विद्यमान आमदार किशोर भाऊ जोरगेवार त्यांनी  निवडणुकीच्या वेळी चंद्रपूरकर जनतेला दोनशे युनिट विद्युत माफ करण्याचे आश्वासन दिले होते.  मात्र ते आमदाराकडून निष्फळ साध्य होत असल्याने तसेच वारंवार सोशल मीडियावर या संदर्भाच्या बातम्या प्रकाशित होतं असल्याने आता मात्र आमदार यांची होणार नाही? ना अशी चिंता जनसामान्यात चर्चिल्या जात आहे.  अशाच आज दिनांक सहा जानेवारी ला समाजवादी पार्टीच्या वतीने अय्युब  कच्ची यांच्या  नेतृत्वात दोनशे युनिट हा मुद्दा घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.  अनेक नारेबाजी आश्वासन पुरे करो,  वर्ण खुर्चीखाली करोकरो,  दोनशे युनिट नाहीतर खुर्ची नाही!  अशा नारेबाजी ठीक बारा वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयावर मोर्चा धडकला. मात्र आमदारच बाहेर असल्याने पोलीसा तर्फे सांगण्यात आले .मोर्चे कराना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणेही निष्फळ ठरले . मोर्चेकऱ्यांनी शेवटी कार्यालया समोर असलेल्या छायाचित्रा वर शाही फेकली व मुर्दाबाद असे नारे देत परत गेले.
 आमदारांनी एक वर्षात दोनशे युनिटचा मुद्या संदर्भात चंद्रपुरात कुठलेही आंदोलन,  उपोषण  चंद्रपूरच्या  जनतेच्या नजरेत नसल्याने,  साधे कोरोना  काळात  वाढीव आलेल्या बिलासंदर्भात कुठलीही ठोक भूमिका घेतली नसल्याने आज चंद्रपुरातील एका राजकीय पक्षाकडून आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.  समाजवादी जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला होता.