मा. शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 80 वृद्धांना काठीचा आधार
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
दि 12 डिसेंबर 2020 ला माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त भिवापूर वार्डातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ. मंगला आखरे यांच्या संकल्पनेतून वार्डातील वृद्ध नागरीकांना काठीचा आधार अशावा, चालण्याचे बळ मिळावे यासाठी त्यांनी वार्डातील 80 वयोवृद्ध नागरीकांना काठीचे वाटप करण्यात आले. आयुष्यात उतरत्या वयात अनेक दाम्पत्याचे
मुले परिवार हा दुर झालेला असतो. अशा वेळी त्याच्या जवळ आधार म्हणून कोणीही नसतो. मग त्यांच्या एकमेव आधार असतो तो म्हणजे काठी, हिच संकल्पना नगरसेविका मंगलाताई आखरे यांनी साकारली. आणि या काठीचा वाटप
काँग्रेस पार्टीचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते व महापालिकेचे गट नेते श्री दिपक जयस्वाल, नगरसेविका सौ मंगलाताई आखरे, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, मा. किशोर रायपुरकर, मा. बंटी इरगुराला, विठ्ठल कडू, प्रकाश चेरकुरवार, दिपक बुजाडे,सौ. अनिता घुबडे, सौ. वहिदा शेख, वैशाली पांडव, बचतगटांच्या महिला व वार्डातील नागरीकांनची या वेळी उपस्थिती होती.
दिनचर्या न्युज