अखेर गुन्हे अन्वेषण विभागाकडून विविध कलमान्वये गुन्हे दाखल, आरोपी मात्र भुमिगत!





अखेर गुन्हे अन्वेषण विभागाकडून विविध कलमान्वये गुन्हे दाखल, आरोपी मात्र भुमिगत!

चंद्रपूर :-

राज्यात कमित कमी 250 लहान मोठे उद्योगांना महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ सबसिडीचा कोळसा दिला जातो. या लाखो टन कोळसा चोरीच्या व धोकाधधाडीच्या प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सात दिवसांत खोजबिन करून शेवटी कोळसा चोरीच्या प्रकरणात गुन्हेगारांवर गून्हा घुग्घुस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. दिनांक 24 फेबुवारीला सायंकाळी 7-30 ला कोळशाच्या चोरीतील तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामंडळाकडून जबाबी पत्र प्राप्त होताच एलसीबीने भादंवि कलम धारा 464,465,468,471,420,34 अन्वये गुन्हा दाखल केले आहे.स्थानिक सुत्राकडूंन मिळेल्या माहिती नुसार कोळसा अफरातफरीतील मुख्य सुत्रधार कैलास अग्रवाल सहा महीण्यापासून बंद पडलेली कंपणी रोशन लाइम वर्क्स वणी - राजूर, आसिफ रहमान आणि प्राइड कोल आणि मिनरल्स प्राय. लि. के. शहजाद शेख सोबत कोल डेपो मालीक आणि काही ट्रांसपोरटरकरांचे नाव गुन्हेगारांचा
यादीत असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात अनेक विभाग सहभागी असल्याचे बोलले जात आहे. विमला साइडींग परिसरातील व नागाळा परिसरातील कोळसा टालवर सबसिडीचा कोळसा पुरवठा केला जात आहे. दर महिन्याला 32000 मिलीटन कोळसा झुटे कागजाद जोडून उधोगाच्या नावाने ते सरळ खुल्या मार्केटमध्ये विकण्याचा खेळ खंडोबा सुरू होता. या प्रकरणात अनेक मोठे कोळसा व्यापारी असल्याची शंका वर्तविली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रतिटन कोळसा 1600रूपये मध्ये उच्च प्रतीच्या कोळसा घेऊन तो उधोगाच्या कंपनीच्या नावाने सरळ कोलस्टाॅलवर खाली करून हेराफेरी त्याला प्रतिटन 6000 रुपयात विकून त्यावर मोठा नफा कमावला जात आहे. अशा प्रकारचा कोळसा माफिया कडून फार मोठे गबाळ बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.