ब्रेकिंग न्यूज
कैलास अग्रवाल यांच्यासह ३० पेक्षा जास्त कोळसा व्यापाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल ?
एलसीबी च्या हाती लागले महत्वपूर्ण दस्तऐवज, महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा होऊ शकते पोलिस कारवाई !
कोळसा चोरी विशेष :-
संपूर्ण विदर्भात नागाडा येथील कैलास अग्रवाल यांच्या कोळसा टाल वर पडलेल्या पोलिस धाडीत मिळालेल्या चोरीच्या कोळशाचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाचा तपास एलसीबी चे पोलिस निरीक्षक कोकाटे यांच्या नेत्रुत्वात सुरू असून कुठल्याही परिस्थितीत कोळसा चोरीच्या या प्रकरणात कोळसा व्यापारी यांच्यावर गुन्हे दाखल करा असा राजकीय दबाव त्यांच्यावर असल्याने त्यांनी या प्रकरणात चौकशीला वेग आणला आहे. या तपासात त्यांच्या टीमकडे कोळसा ज्या लघु ऊद्दोग व पॉवर प्लांट मधे जात आहे त्या संदर्भातील वेकोलि प्रशासनाकडून व संबंधित कंपन्याकडून दस्तऐवज हाती लागले असून आता केवळ संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई तेवढी शिल्लक असल्याचे बोलल्या जात आहे.
एकीकडे या अवैध कोळसा साठवणूक व वाहतूक प्रक्रियेत दोषी कोळसा व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र स्टेट मायनिंग किंव्हा ज्या कंपन्यांना हा कोळसा पुरवठा होत आहे त्या कंपनीचे संचालक पोलिस तक्रार देण्यास पुढे येत नसतांना कोळसा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा कसा हा प्रश्न पोलिसांसमोर असतांना आता राष्ट्रीय संपत्तीचा अपहार केल्या प्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी. तहसीलदार किंव्हा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सुद्धा तक्रार दिल्यास कोळसा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात असा नियम आहे.त्यामुळेच आता कोळसा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया आज सुरू होण्याची शक्यता आहे, या प्रकरणात चंद्रपूर, वणी, यवतमाळ, नागपूर .गोंदिया, भंडारा, अकोला येथील ऐकून ३० पेक्षा जास्त कोळसा व्यापारी पोलिसांच्या रडारवर असून महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनचे अधिकारी सुद्धा या प्रकरणात तेवढेच दोषी असल्याने त्यांच्यावर सुद्धा आज सायंकाळ पर्यंत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.