दोन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
ललित लांजेवार:चंद्रपुरात घरफोडी प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हि कारवाई केली. चौकशी दरम्यान त्याने सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली.यात रामनगर पोलिस ठाणे हद्दीत चार, तर दुर्गापूर हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ८८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक बोरकुटे, दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, महेंद्र भुजाडे यांच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. आणखी त्याच्या सोबत दोन साथीदार असल्याचे सांगितले.
पोलिसांनी जो २ लाख रुपयाचा माल जप्त केला त्यात सोन्याचे दागिणे, दुचाकी, चांदीचे दागिणे,लॅपटॅप, चार मोबाईल, असा एकूण २ लाख ८८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. असून इतर पसार आरोपींचा शोध सुरु आहे.