वाडीत तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा
नागपूर/अरुण कराळे:
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनविण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तंत्रशिक्षणाची देशाला गरज आहे . असे प्रतिपादन प्राचार्य डॉ . गणेश आखाडे यांनी केले .
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व विभागीय कार्यालय नागपूर जी.एच रायसोनी तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग १० वी व १२ वी परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा टप्पा ओलांडून अशा वळणावर उभे असतात जिथे शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.बऱ्याच संधी विषयी विद्यार्थी व पालकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अशा वेळेस कोणते निर्णय घ्यावेत याबाबत गोंधळाची परिस्थिती असते.योग्य तो अभ्यासक्रम निवडणे सोपे व्हावे या दृष्टीने तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे दत्तवाडीतील प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल, जिल्हा परीषद हाईस्कूल निलडोह,सी.पी.बेरार हायस्कूल,धरमपेठ हायस्कूल,नंदनवन हायस्कूल,गजानन हायस्कूल या सहा ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमाचे उदघाटन करिअर मेंटरचे संचालक आशिष तायवाडे यांनी केले . अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गणेश आखाडे होते . प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ.एस.जे.पाटील,डॉ. प्रशांत कडू, मुख्याध्यापीका स्मिता विसपुते, मुख्याध्यापक पुरुषोत्तम कामडी ,मिनाक्षी घोडखांदे ,विजय काळे, वैदही गाडे,मिलिंद देशमुख,मंगेश जाधव,नितीन ठाकरे,लक्ष्मी बोरखंडे,मीनाक्षी कोरडे ,एस.के.काळबांडे, विजय शहाकार प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ.एस.जे.पाटील व प्रादेशिक कार्यालय पी.के.सोनकांबळे यांचे आभार मानले.
या मेळाव्यात तीनहजार विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाचे मार्गदर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनात तंत्रशिक्षण विषयी मार्गदर्शकांना प्रश्न विचारले. मेळाव्यात तंत्र शिक्षण, पॉलिटेक्निक , फार्मसी,इंजिनिअरिंग,फायर इंजिनिअरिंग,फॅशन डिझाइनिंग,ड्रेस डिझाईन,हॉटेल मॅनेजमेंट अशा तंत्रशिक्षणाची माहिती दिली . संचालन प्रा.दिनेश बोधनकर व आभार प्रदर्शन अरुण वानखेडे यांनी केले. आयोजनासाठी विजय छापेकर,सुरेंद्र भोतमांगे,श्रुती पलकंडवार,विकास बायस्कर,सादिक अलीसय्यद,चंदू छापेकर,अरविंद पाचेकर,मेघराज मानकर,जितू वाट यांनी सहकार्य केले.