चंद्रपूर जिल्ह्यात १४ वर्षाखालील शेकडो मुलांना मधुमेह

चंद्रपूर/प्रतीनिधी:

 चंद्रपूर जिल्ह्यात १४ वर्षाखालील शेकडो मुलांना मधुमेह असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चंद्रपूर शहरात दोन दिवस घेण्यात आलेल्या आरोग्य महामेळाव्यात १०० वर लहान मुले मधूमेह आजाराने ग्रस्त असल्याची  बाब समोर आली आहे. या रुग्णांना दररोज इन्सुलिन व सिरींजचा खर्च करावा लागतो. काही रुग्णांना महिन्याकाठी दोन हजारांहून अधिक  खर्च येत असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाणे सांगितले . या रुग्णांना केंद्र शासनाने मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करून मंजूर व्हावा, यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

हा आजार केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नाही, तर देशात सर्वत्र आहे. हा प्रस्ताव शासनाने मान्य केल्यास त्याच धर्तीवर देशातील मुलांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकतो. ही मुले कशी जगतात. याबाबत महाआरोग्य मेळाव्यात त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १४ वयोगटापर्यंत असलेली मधुमेह झालेली मुले स्वत: इन्सुलिन घेतात. यातील अनेक मुले गरीब कुटुंबातील आहेत.