मल्टी ऑगर्निक्स विरोधाच्या लढ्याला"धर्मराज्य पक्षा"चा जाहीर पाठिंबा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

शहरालगतच्या दाताळा एमआडिसीतील मल्टी ऑगर्निक्स या कंपनीने रासायनीक कचरा सोनुल्री रोड व दाताळा नाला वनजमीनीवर टाकल्यामुळ सहा गावातील भूजल प्रदूषित झाले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही जिल्हा प्रशासन, प्रदुषण विभाग, पोलिस विभाग व वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने गेल्या १५ जानेवारीपासून प्रदुषण मंडळ|च्या कार्यालयासमोर 'राजेशजी बेले' बेमुद्दत आमरण उपोषणाला बसलेले आहे; MIDCतील मल्टी ऑगर्निक्स कंपनीकडून मानव व वन्यप्रान्याच्या जीवीतास धोकादायक ठरणारे रासायनीक पाणी सोडले जात आहे. 
वायु प्रदुषणही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने चंद्रपुर, चिचाळा, खुटाळा, लहुजीनगर, म्हाडा कॉलोनी, देवाडा, दाताळा या गावांमधील भुजलामधे घातक द्रव्य मिश्रीत झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळ या कंपनीवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदर कंपनीकडून प्रदुषण केले जात असल्याने ही कंपनी तात्काळ बंद करण्याचे आदेश द्यावे, लहुजीनगरात शुद्ध पेयजल सुविधा उपलब्ध करावी, जिल्ह्यधिकाऱ्यानी कंपनीच्या प्रदुषणाबाबत उच्चस्तरीय चौकशी समीति गठीत करण्यात यावी, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यानी जल व वायु प्रदुषणाची तपासणी करण्यासाठी पर्यावरण तन्याची समीति गठीत करावी व कंपनीच्या पर्यावरण समितीची चौकशी करावी आदी मागण्या राजेशजी बेले यांनी केल्या आहेत.

दरम्यान, त्यांच्या उपोषण स्थळ|च्या मंडपाला आज शुक्रवार,दि. १८ जानेवारी २०१९ला 'भारतातील पहिला-वहिला पर्यावरणवादी पक्ष' असलेल्या "धर्मराज्य पक्षा"चे चंद्रपुर जिल्हा समन्वयक श्री. प्रदीप उमरे यांनी भेट देऊन, राजेशजी बेले यांच्या लढ्याला 'धर्मराज्य पक्षा'चा जाहीर पाठीबा घोषीत केला. लवकरच 'धर्मराज्य' तर्फे जिल्हाधिकारी व प्रदुषण नियंत्रण मंडळाला निवेदन देऊन याचा जाब विचारन्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.